आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Student Of IIT Madras Disappear From Her Hostel Notes Said Leaving Himalaya For Spirituality

IIT मद्रासची विद्यार्थीनी बेपत्ता: रुममध्ये सापडले पत्र- हिमालयात जात आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - आयआयटी मद्रासची विद्यार्थिनी वेदांतम एल. प्रत्युषा (26) मंगळवारी बेपत्ता झाली. हॉस्टेलमध्ये तिने एक पत्र सोडले आहे, त्यात तिने आध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी हिमालयात जात असल्याचे म्हटले आहे. ती असे काही करेल याची तिच्या पालकांनीही कल्पना नव्हती.

प्रत्युषा आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील ब्रॉदिपेट येथील रहिवासी आहे. आयआयटी-एममध्ये डिपार्टमेंट ऑफ इंजिनिअरिंग डिझाइनच्या दुसऱ्या वर्षाची ती विद्यार्थीनी आहे. हॉस्टेलमधील तिच्या रुममध्ये सापडलेल्या पत्रात तिने साहस आणि अध्यात्माच्या शोधात हिमालयात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सोशल नेटवर्किंग साइटवरही प्रत्युषाने तिचे पत्र अपलोड केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला रामायण, महाभारत आणि भगवतगीता वाचण्याची आवड आहे. प्रत्युषाला इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) बद्दल आस्था आहे. इस्कॉनची मंदिरे जगभरात आहेत.

काय म्हणाले विद्यार्थी
- प्रत्युषाच्या मैत्रिणींनी सांगितले, आम्ही तिला शेवटचे रविवारच्या सकाळी पाहिले होते.
- सूत्रांचे म्हणणे आहे, की तिने रविवारी सकाळीच रुम सोडली होती.
- काही विद्यार्थ्यांनी सांगितले, की तिच्या बेपत्ता होण्याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली आहे.
- जेव्हा हॉस्टेलमधील प्रत्युषाची रुम उघडण्यात आली, तेव्हा तिथे इंग्रजी आणि तेलगु भाषेतील पाच पाने मिळाली. त्यातील दोनवर इंग्रजीत नोट लिहिली होती, तर तीन पाने तेलगुमध्ये होती.
- एका अधिकाऱ्याने सांगितले, प्रत्युषाने तिच्या आगामी योजनेबद्दल कुणालाही सांगितलेले नाही.
- तिच्या मैत्रिणींनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाइल स्विच ऑफ होता. तिच्या घरी संपर्क करण्यात आला, पालकांनी ती घरी आली नसल्याचे सांगितले.
- दुसरीकडे, हॉस्टेलच्या रजिस्टरमध्ये तिने 20 तारखेला परत येणार असल्याचे लिहिले आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, आयआयटी-एम चे संचालक काय म्हणाले