आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी एक, परीक्षा क्रमांक मात्र दोन; एकात पास, दुसऱ्यात फेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाजिपूर- बिहारमध्ये टॉपर घोटाळ्याचा सूत्रधार बच्चा राय व बिहार बोर्डाचा माजी अध्यक्ष लालकेश्वर प्रसादच्या हातमिळवणीमधून बिहार इंटर परीक्षेत करण्यात आलेला आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. व्हीआर महाविद्यालयात अशी िवद्यार्थ्यांची अनेक नावे उघड झाली असून ज्यांना दोन दोन रोल नंबर देऊन परीक्षेला बसवण्यात आले आहे. शंका अशी आहे की, एका रोल नंबरवर िवद्यार्थी स्वत: परीक्षा देत असे तर दुसऱ्यात स्कॉलर बसवले जात असे. सेंटवर परीक्षा मॅनेज करतेवेळी िकंवा पेपर्सची अदलाबदल करताना कुणी अडकू नये तसेच निकालावर त्याचा परिणाम दिसू नये म्हणून असे केले जात होते. दैनिक भास्करकडे व्हीआर कॉलेजच्या जवळपास २० नावे आहेत, ज्यांचे रोल नंबर व गुणपत्रिका दोन - दोन आहेत. एका रोल नंबरमध्ये विद्यार्थी पास असून दुसऱ्यात मात्र नापास दिसत आहे.
असा लक्षात घ्या घोटाळ्याचा खेळ
- सर्वप्रथम निवडण्यात आलेल्या एकाच महाविद्यालयात दोन वेळा नोंदणी केली जात असे.
- बोर्डासोबत हातमिळवणी करून दोन्ही नोंदणींना सलग रोल नंबर दिले जात असत.
- स्कॉलरचे अॅडमिशन कार्ड बोर्ड नव्हे तर कॉलेज देत असे. त्यावर फोटाे लावून त्याचे सत्यांकन करण्याची जबाबदारी कॉलेजची असे. छाप्यात व्हीआर कॉलेजचा माजी सचिव हरिहर नाथ झाची स्वाक्षरी असलेले साधे कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
- कॉलेजने जारी केलेल्या अॅडमिन कार्डवर स्कॉलरचा फोटो लावून त्यालाच परीक्षेत खऱ्या बाजूला बसवण्यात येत असे. म्हणजे सगळे खरे वाटावे.
- अशा सर्व निकाल फेरमूल्यांकनासाठी पाठवला जात असे. ते निकाल लालकेश्वर जारी करत असे.
- काही प्रकरणांत मात्र चूक झाली. स्कॉलरच्या पेपरएेवजी गायब करण्याऐवजी चूकून तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. त्यामुळे दोन क्रमांक मिळाले.
पुढे पाहा अशी झाली, एका विद्यार्थ्याची नोंदणी दोन वेळा
बातम्या आणखी आहेत...