आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मठेपेच्या कैद्याने तुरुंगातून दिले धडे; मुलगा झाला आयआयटीएन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा, राजस्थान- जिद्द आणि परिश्रमाची तयारी असेल तर मुलगा कुठेही शिकून उच्च शिक्षण घेतो. त्याचेच एक उदाहरण राजस्थानात दिसून आले आहे. एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शिक्षक पित्याने मुलाला तुरुंगातून आयआयटीचे धडे दिले आहेत. विशेष बाब म्हणजे कैद्याचा मुलगा पीयूषनेदेखील पित्यासोबत मुक्त तुरुंगात आठ बाय आठच्या खोलीत राहून आयआयटीचे धडे गिरवले आहेत.
मुलाच्या शिक्षणात कोणतीही कसर राहू नये यासाठी पिता दिवसभर तुरुंगात मजुरी करत असे सायंकाळी सहा ते रात्री दोनपर्यंत मुलाला कोठडीबाहेर बसून शिकवत असे. निकाल आला तेव्हा मुलाने एसटी प्रवर्गातून ४५३ वी रँक मिळवली होती.

राजस्थानात चेचट तालुक्यातील डांकिया गावातील शिक्षक फुलचंद मीना सरकारी शिक्षक होता. २००१ मध्ये एका खूनप्रकरणी फुलचंद, त्याचा भाऊ, तीन भाचे वडिलांना आरोपी बनवण्यात आले होते. त्यात २००७ मध्ये फुलचंदसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. फुलचंदची पत्नी जेव्हा जेव्हा तुरुंगात त्याला भेटायला जात असे तेव्हा तो मुलगा पीयूषच्या शिक्षणावर लक्ष देण्यास सांगत असे. याच काळात चांगल्या वर्तनामुळे फुलचंदला कोटा येथील खुल्या कारागृहात ठेवण्यात आले. त्यानंतर त्याने पत्नी मुलगा पीयूषलाही तेथेच बोलावून घेतले. मुलाच्या शिक्षणात पैसा किंवा इतर अडथळे येऊ नयेत म्हणून फुलचंदने रात्री मजुरी करणे सुरू केले. त्यानंतरही कोचिंगमध्ये प्रवेशासाठी पैसे कमी पडले तेव्हा नातेवाइकांकडून उधार घेऊन त्याने मुलाचा प्रवेश केला. पैशाची टंचाई असल्याने मुलाला होस्टेलवर ठेवता येत नव्हते. तेव्हा पीयूषनेही तुरुंगातच राहून वर्षभर अभ्यास केला. मीणाची कोठडी छोटी होती, परंतु तिथेच राहून त्याने अभ्यास केला.

इंजिनअरिंगच्या तयारीसाठी पाठबळ
पीयूषनेसांगितले की, वडिलांनीच मला इंजिनिअरिंगची तयारी करण्यासाठी मानसिक पाठबळ दिले. कुटुंबातील इतर सदस्य पैसे नसल्याने आणखी काेचिंग अवघड असल्याचे सांगत असत. तेव्हाही वडील शिक्षणासाठी कायम आग्रह धरत असत. पहिल्या वर्षी कोचिंगमध्ये रिझल्ट चांगला आला नाही तेव्हा मी तणावाखाली आलो. जर यशस्वी ठरलो नाही तर पित्याचे स्वप्न सन्मानाला धक्का लागेल. त्या वेळी वडिलांनी समजावले की तणाव घेता केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित कर. शिक्षणामुळे वर्षभर कोणत्याही नातेवाइकाकडे गेलो नाही कार्यक्रमात सहभागी झालो नाही. पीयूषने सांगितले की, आयएएस होण्याचे त्याचे स्वप्न आहे.

माझे नातेवाईक आरएएस अधिकारी असून त्यांनीही मला समजावले की, आधी शिक्षण पूर्ण करून ध्येयापर्यंत जा. मग तुला अनेक मार्ग दिसू लागतील.
बातम्या आणखी आहेत...