आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Teen Girl Of Telangana Alleged Commit Suicide After Lack Of Toilet

घरात टॉयलेट नसल्याने तेलंगणात मजुराच्या मुलीने केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नलगोंडा- देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा होत असताना तेलंगणात एका मजुराच्या 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. घरात शौच्छालय (टॉयलेट) नसल्याने तिने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. कदापार्थी रेखा असे मृत मुलीचे नाव आहे.

कदापार्थी रेखाने आई -वडिलांकडे घरात शौच्छालय बांधण्याची मागणी केली होती. परंतु तिच्या आई-वडिलांनी ते करण्याचीही ऐपत नव्हती. त्यामुळे ते मुलीची मागणी पूर्ण करू शकले नाही.

टॉयलेटसाठी उघड्यावर जावे लागत होते...
- कदापार्थी रेखा ही गुंडाला सबडिव्हिजनची राहाणारी होती. रेखा ज्यूनियर कॉलेजची स्टूडेंट होती.
- टॉयलेटसाठी उघड्यावर जावे लागत असल्याचे रेखा त्रस्त होती, असे चौकशी अधिकारी राजू यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
- इतकेच नव्हे तर घरातील बाथरूम देखील ताडपत्रीचे होते.
- रेखाचे आई-वडिल मोलमजुरी करतात. त्यांच्याकडे इतके रुपये नाही, की ते घरात टॉयलेट-बाथरुम बांधू शकतील.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...