आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलंबियात ३० जणांची हत्या, अल्पवयीन आरोपी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोगोटा- कोलंबिया पोलिसांनी ३० हून अधिक जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या १७ वर्षीय आरोपीची आेळख फ्रिजोलितो अशी सांगितली. अल्पवयीनाच्या खासगी जीवनाची गोपनीयता राखण्याचा कडक कायदा कोलंबियात आहे.

कॅलीमध्ये शुक्रवारी पोलिस म्हणाले, या धोकादायक असलेल्या आरोपीची चार महिन्यांसाठी सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यादरम्यान त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.  आरोपीने वयाच्या १२ व्या वर्षांपासून हत्या करण्यास सुरुवात केली होती. त्याने अलीकडेच कॅलीच्या एका शॉपिंग सेंटरमध्ये  दोन जणांची हत्या केली होती. त्याचे वय १८ वर्षे झाल्यानंतर त्यास तुरुंगात पाठवण्यात येणार आहे. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच  घटना आहे. 
बातम्या आणखी आहेत...