आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadmi Party Leader Arvind Kejriwal Attacked In Haryana News In Marathi

माझ्यावरील हल्ला हे राजकीय षडयंत्र - अरविंद केजरीवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिंद - आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे हरयाणात रोड शो सुरू आहेत.परंतु शुक्रवारी रात्री चरखी दादरी येथे त्यांना मारण्यात थापड मारण्यात आली होती.या थप्पडची गूंज शनिवारी ऐकू येत होती.हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आपने काँग्रेस आणि भाजपसारख्या बड्या राजकीय पक्षांचा खेळ बिघडवला. यामुळेच असे हल्ले होत आहेत.

केजरीवाल यांनी शनिवारी जिंद शहर आणि अनेक गावांमध्ये आप उमेदवारासाठी रोड शो केले. त्यानंतर नरवाना येथे एक जाहीर सभाही घेतली. केजरीवाल म्हणाले, चरखी दादरीमधील कानशिलात लगावणारा अण्णा हजारे समर्थक नव्हता. त्याला कुणी पाठवले हे सर्वांनाच माहिती आहे. अर्थात त्यांनी क ोणत्याही राजकीय पक्षाचे नाव घेतले नाही. थापड मारणार्‍या तरुणाला आप समर्थकांनी चोप दिला याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. अशा घटना पुन्हा घडल्यास कुणीही मारहाण करणार नाही अशी शपथ घ्या असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले. कार्यकर्त्यांनी त्यागासाठी तयार राहावे असा सल्ला त्यांनी दिला.