आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्‍या टोमण्‍यामुळे महिलेने उचलले असे पाऊल; थेट भाजप-काँग्रेसशी घेणार टक्‍कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती गौरवसोबत प्रियंका माहेश्‍वरी. - Divya Marathi
पती गौरवसोबत प्रियंका माहेश्‍वरी.
लखनौ- उत्‍तर प्रदेश पालिका निवडणुकांमध्‍ये प्रथमच आम आदमी पक्ष उतरत आहे. युपीची राजधानी लखनौच्‍या महापौरपदासाठी आपने आपला उमेदवारही जाहीर केला आहे. त्‍यांचे नाव आहे प्रियंका माहेश्‍वरी. त्‍या आपल्‍या पतीसोबत स्‍टेशनरी मॅन्‍युफॅक्‍चेरिंग आणि सप्‍लायचे काम मरतात. राजकारणामध्‍ये प्रवेश कसा झाला, यासंबंधीची एक स्‍टोरी त्‍यांनी आमच्‍याशी शेअर केली आहे.
 
पतीच्‍या एका टोमण्‍यामुळे घेतला निर्णय
- प्रियंका यांनी सांगितले की, 'माझे पती गौरव आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहे. घरात ते नेहमी राजकारणासंबंधी बोलत असतात. त्‍यांच्‍या बोलण्‍यामध्‍ये मला नेहमी रस असतो. मी एकदा त्‍यांना म्‍हणाले की, राजकारणाचे नाव घेतले की, मला चीड येते. राजकारणी बोलतात एक करतात वेगळेच. त्‍यांच्‍यापासून जेवढे अंतर ठेवले तेवढे चांगले. याऐवजी युवकांनी उद्योगधंद्यांवर लक्ष दिले पाहिजे.'
- 'एवढेच ऐकताच गौरव यांना खूप राग आला. ते ताडकन म्‍हणाले, उद्या आपले मुलेही असेच म्‍हणतील. सर्वजण राजकारणाला घाणेरडेच म्‍हणेल तर याला स्‍वच्‍छ कोण करेल?  असे म्‍हणत जेवण न करताच ते घरातून निघून गेले.'  
- 'गौरवच्‍या बोलण्‍यावर माझ्यावर चांगलाच परिणाम झाला. दिवसभर मी ओळखीच्‍या लोकांशी राजकारणावर चर्चा केली. माझे विचार ऐकल्‍यावर सर्वजण म्‍हणाले की, तु जर राजकारणात आली तरच याला बदलू शकशील. संध्‍याकाळ होताहोता मीही निर्णय घेऊन टाकला की, मी या क्षेत्रात उतरणार आणि समाजामध्‍ये सुधारणा घडवून आणणार.'
- 'संध्‍याकाळी गौरव घरी आल्‍यानंतर मी त्‍यांना माझा निर्णय सांगितला. ते ऐकून प्रथम ते हसले. नंतर पालिका निवडणुकांध्‍ये उतरण्‍याचा माझा निर्णय पक्‍का झाला.'

असा सुरु केला होता बिझनेस
- प्रियंका सांगतात की, 'मी मूळ आग्र्याची रहिवासी आहे. माझे बीकॉम आणि एमबीएही तेथेच झाले आहे. वडीलांचा टेक्‍सस्‍टाईल बिझनेस आहे. त्‍यांच्‍याकडूनच मी बिझनेसमधील बारकावे शिकले. एमबीए झाल्‍यानंतर नोकरीसाठी काही मुलाखतीही दिल्‍या. नंतर मात्र मला वाटले की, माझे स्‍वप्‍न व्‍यवसाय करुनच पूर्ण होऊ शकते. त्‍यामुळे नंतर मी कधीही नोकरी केली नाही.'
- '2009मध्‍ये एमबीए करत होते तेव्‍हाच माझे लग्‍न गौरव यांच्‍याशी ठरले होते. तेव्‍हा ते स्‍टेशनरी स्‍प्‍लायचे काम करायचे. लग्‍नानंतर मी त्‍यांना स्‍वत:चा व्‍यवसाय सुरु करण्‍याचे आपले स्‍वप्‍न आहे, असे सांगितले. तेदेखील यासाठी तयार झाले. आम्‍ही दोघांनी मिळून स्‍टेशनरी मॅन्‍युफॅक्‍च्‍युरिंग युनिट बसवले. गौरव स्‍प्‍लाय विभाग पाहत होते. इतर सर्व विभागांचे कामकाज मी पाहत होते. सध्‍य आमच्‍या जवळ 2 डझनहून अधिक लोक काम करतात.'   
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...