आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadmi Party To Host Tea Party In Gurgaon Cost May Upto 5000 Rupees

पक्षनिधीसाठी 'आप' करणार टी पार्टी, एक कप चहासाठी द्यावे लागणार पाच हजार रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - आम आदमी पार्टी (आप) आता इतर राजकीय पक्षांप्रमाणे होत चालली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चा' कार्यक्रमाच्या धरतीवर आता आपने देखील टी-पार्टीचे आयोजन केले आहे. मात्र, भाजपच्या चाय पे चर्चा कार्यक्रमाप्रमाणे येथे फुकटात चहाचे झुरके घेता येणार नाही. आपच्या टी पार्टीचा उद्देश लोकसभा निवडणूकीसाठी निधी गोळा करण्याचा आहे. त्यामुळे येथे एक कप चहासाठी पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
गुडगावमध्ये आपच्या टी पार्टीचे 29 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. गुडगाव येथून आपच्या तिकीटावर पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव निवडणूक रिंगणात आहेत. या चहापानाच्या कार्यक्रमात उमेदवार यादव समर्थकांशी चर्चा करणार आहेत. आपचे गुडगाव संयोजक संजयकुमार म्हणाले, टी पार्टीमध्ये योगेंद्र यादव विविध स्तरातली लोकांसोबत चर्चा करतील. त्यांच्या काय समस्या आहेत, त्या जाणून घेतील आणि पक्षाची भूमिका त्यांच्यासमोर मांडतील.
येथे होणा-या टी पार्टीचे आयोजन शहरात कुठे होणार हे अजून ठरायचे असले तरी, एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होईल, अशी शक्यता आहे.