आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादानंतर लुधियानाला पोहचला मि. परफेक्शनिस्ट, वेटरला विचारले, कशी आहे परिस्थिती ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेलच्या रुममध्ये आमिर खान - Divya Marathi
हॉटेलच्या रुममध्ये आमिर खान

लुधियाना - मायानगरी मुंबई आणि इतर ठिकाणी सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनांच्या दरम्यान अभिनेता आमिर खान चित्रपटाच्या शुटिंगसाठी लुधियानाला पोहोचला आहे. तो येथे पोहोचण्याआधी शिवसैनिकांनी हॉटेलबाहेर घोषणाबाजी करुन वातावरण ढवळून काढले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेल परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली. आमिर ज्या रुममध्ये थांबला आहे त्या फ्लोअरवरील सर्व रुम्स रिकाम्या करण्यात आल्या आणि तिथे फिल्मच्या टीमची राहाण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्या दोन रुम आधीपासून बुक होत्या त्यांना आमिरच्या सुरक्षेच्या कारणामुळे खाली करण्यात आले.
बुधवारी सायंकाळी डीसीपी नरेंद्र भार्गव, एसीपी रुपिंदर कौर सराह यांनी हॉटेलची पाहाणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला. फिरोजपूर रोडवरील या हॉटेल परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे.

आमिरने वेटरला विचारले, कशी आहे परिस्थिती ?
आमिरच्या रुममध्ये चहा देण्यासाठी आलेल्या वेटरला आमिरने लुधियानाती परिस्थिती कशी आहे याची विचारणा केली. वेटरने सकाळी झालेल्या घोषणाबाजीची त्याला माहिती दिली. डीसीपी भार्गव म्हणाले, आमिरच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हॉटेल आणि हॉटेल बाहेर आमिरच्या सुरक्षेत तैनात पोलिस आणि संबंधित फोटो..