आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan & Intolerance Controversy : Now A R Rahman Joins The Debate

#Intolerance: रेहमान म्हणाला, मी कट्टर मुस्लिम असहिष्णुतेचा सामना केलाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- 'मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा पत्नीने (किरण राव) भारतच सोडून जाऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती', असे बॉलिवूड अभिनेता आमिर खानने म्हटले होते. त्यानंतर आमिरवर चहूबाजूंनी टीका होत आहे. या वादंगाचा धुरळा खाली बसतो न् बसतो तोच आता संगीतकार व ऑस्कर विजेता ए.आर.रेहमान याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

'काही महिन्यांपूर्वी आपण देखील आमिर खानप्रमाणे असहिष्णुतेचा सामना केला होता', असे रेहमानने म्हटल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.

दरम्यान, देशातील असहिष्णुता पाहाता आपण देश सोडून जाऊ, अशी इच्छा पत्नीने व्यक्त केल्याचे विधान आमीर खानने सोमवारी केले होते. याआधी देशात असहिष्णुता वाढते आहे, हे विधान काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खाननेही केले होते. त्यानंतर त्याच्यावरही टिकेची झोड उठली होती.

गोव्याची राजधानी पणजीमध्ये आयोजित 46 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये (IFFI) ए.आर.रहेमान उपस्थित होता. काही महिन्यांपूर्वी आपण देखील आमिर खान प्रमाणे देशातील असहिष्णुतेचा सामना केल्याचे रहेमानने यावेळी सांगितले. मुंबईतील रजा अकादमीद्वारा जाहीर करण्‍यात आलेल्या एका फतव्याचा संदर्भ देताना रहेमानने वरील वक्तव्य केले आहे. इराणी सिनेमा 'मोहम्मदः मेसेंजर ऑफ गॉड'ला म्युझिक दिल्यामुळे रजा अकादमीने रहेमानविरोधात फतवा जारी केला होता. इराणमधील हा सर्वात महागडा सिनेमा होता. 253 कोटी रुपये या सिनेमाचे बजेट होते.

दरम्यान, आमिर खान वादाच्या भोवर्‍यात अडकल्यानंतर शाहरुख खानने युटर्न घेतला आहे. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे आपण वक्तव्य केलेच नसल्याचे आता शाहरुखने म्हटले आहे. दुसरीकडे, 1984 मधील शीख दंगल व 2002 मध्ये गुजरातमध्ये उसळलेली हिंदु-मुस्लिम दंगलीनंतर देशात उद्‍भवलेली परिस्थिती भीषण होती. सध्या देशात तसे वातावण नसल्याचे कवी निदा फाजली यांनी म्हटले आहे.