आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींचा विकासाचा दावा खोटा, गुजरातमध्ये तरुण-शेतकरी त्रस्त - केजरीवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथूरा - नुकताच गुजरातचा दौरा करुन आलेले आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा विकासाचा दावा खोटा असल्याची टीका केली आहे. गुजरातमध्ये बेरोजगार तरुणांची मोठी फौज आहे, शेतकरी त्रस्त आहेत. उद्योग कोणी करायचा असेल तर तो फक्त अंबानी आणि अदानी यांनीच असे गुजरातमधील धोरण असल्याची टीका केजरीवाल यांनी येथे जनसभेत केली आहे.

गुजरातमध्ये सरकारी नोकरीचे दर निश्चित झाले आहेत. भ्रष्टाचाराशिवाय नोकरी मिळत नाही. गुजरातमधील शेतक-याची अवस्था पाहिली तर देशातील एकही शेतकरी मोदी आणि भाजपला मतदान करणान नाही, असा दावा त्यांनी केला.

सविस्तर वृ्त लवकरच..