आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Chief Arvind Kejriwal Begins Road Show In UP, Attacks BJP

मोदी सत्तेवर आल्यानंतरही भ्रष्टाचार कमी होणार नाही - अरविंद केजरीवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद - मुरादाबाद-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल शनिवारपासून ‘मिशन यूपी’वर आहेत. भ्रष्टाचार, महागाई आणि सांप्रदायिकता हे आपले शत्रू असल्याचा नारा त्यांनी दिला. त्याचबरोबर नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी भ्रष्टाचार कमी करू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

गाझियाबादच्या कोसंबी येथून आपल्या यात्रेला त्यांनी शनिवारी सुरुवात केली. ते तीन दिवस उत्तर प्रदेशातील 15 लोकसभा मतदारसंघांचा दौरा करतील. त्यात मुरादाबाद, रामपूर, बरेली, कानपूर, इटावा, फिरोजाबाद, आग्रा, मथुराचा समावेश आहे. रविवारी केंद्रीय मंत्री र्शीप्रकाश जयस्वाल यांच्या कानपूर मतदारसंघात सभा घेतील. यूपी मिशननंतर ते गुजरातकडे रवाना होतील.

8 मार्चला अहमदाबादला त्यांचा दौरा आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण जातीच्या आधारावर असून या शोदरम्यान विकासाच्या मुद्दय़ावर भर देण्यात येणार आहे. या रॅलीत केजरीवाल यांच्या सोबत पार्टीचे मनीष शिसोदिया आहेत. भ्रष्टाचार, राजकारणातील घराणेशाही आणि गुन्हेगारी याउत्तर प्रदेशच्या विकासातील समस्या असल्याचे मत पार्टीचे राज्यप्रमुख संजय सिंग यांनी व्यक्त केले. कानपूर येथील रॅलीला संबोधित करतील. ‘आप’ला या तीनदिवसीय रोड शोच्या माध्यमातून बड्या नेत्यांसमोर आव्हान उभे करायचे आहे.

‘आप’कडून नवीन यादी
‘आप’ ने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी तिसरी यादी जाहीर केली. त्यात 20 जागांचा समावेश आहे. या यादीबरोबरच पक्षाने आतापर्यंत 70 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तिसर्‍या यादीत जेएनयूचे प्रोफेसर आनंद कुमार, जसपाल भट्टीची पत्नी सविता भट्टी (चंदीगड) आणि डॉ.प्रभात रंजन दास (दरभंगा) यांची नावे आहेत. रचना धिंग्रा (भोपाळ), अनिल त्रिवेदी (इंदुर), शैलेंद्र सिंह कुशवाहा (गुना), माया विश्वकर्मा (होशंगाबाद) यांनाही तिकिट देण्यात आले आहे.

राहुलदेखील यूपी दौर्‍यावर
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देखील उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. शनिवारी मिर्झापूर जिल्ह्यातील मदिहानमध्ये जाहीर सभा घेणार होते. परंतु ऐनवेळी हा दौरा टाळला. त्यानंतर ते बनारसला पोहोचले. तेथे त्यांनी रिक्षाचालकांशी हितगुज केले.

सोनिया-मोदींचे सेटिंग
केजरीवाल यांनी गॅसचे दर आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ांवर नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. गॅसच्या किमतीवर मोदी काहीच बोलत नाहीत. आम्ही शीला दीक्षित यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. परंतु मोदी यांनी रॉबर्ट वढेरा यांच्या विरोधात एकही एफआयआर दाखल केलेला नाही. याचा अर्थ सोनिया गांधी आणि मोदी यांच्यात सेटिंग आहे, असा आरोप त्यांनी केला.