आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Leader Arvind Kejriwal Slapped By A Man In Haryana

अरविंद केजरीवालांवर हल्ला करणार्‍यास ‘आप’ कार्यकर्त्यांनी चोपले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवानी (हरियाणा) - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर शुक्रवारी हरियाणातील चरखी दादरी भागात सभेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. यात त्यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर आपच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरास चांगलेच चोपून काढले. घटनेनंतर केजरीवाल ट्विटरवर म्हणाले, आपल्या मानेवर कुणीतरी जोरदार आघात केला. ‘त्यांच्या’कडून अशा हिंसक प्रतिक्रियांची अपेक्षा होतीच. यातून त्यांचा खरा रंग व हताशा दिसून येते. आपच्या कार्यकर्त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबू नये, अशी विनंतीही केजरीवाल यांनी केली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'आप'च्या उमेदवारांची 12वी यादी...