आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Unit In Gurgaon Quit 250 Workers Had Resigned Yogendra Yadav

'आप' ला मोठा धक्‍का, गुडगाव कार्यकारिणीची पक्षाला सोडचिठ्ठी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव(हरियाणा) - आम आदमी पार्टीच्‍या(आप) गुडगाव कार्यकारिणीच्‍या सदस्‍यांनी राजीनामा दिल्‍याने 'आप' ला मोठा धक्‍क बसला आहे. 'आप'चे गुडगाव संयोजक रमेश यादव, सचिव, कोषाध्‍यक्ष, तसेच संस्‍थापक सदस्‍यांसहित 11 लोकांनी पार्टीच्‍या कामकाजावर नाराज होऊन अरविंद केजरीवालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्‍याचबरोबर 250 कार्यकर्त्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गुडगाव लोकसभा 'आप'कडून योगेंद्र यादव लढविणार आहेत.

पार्टीवर नीती बदलण्‍याचा आरोप
रमेश यादव यांनी पार्टीवर नीती बदलण्‍याचा आरोप केला आहे. रमेश यादव म्‍हणाले, की पार्टी आपल्‍या विचारांपासून भरकटत आहे. दिल्‍लीमध्‍ये आपली जबाबदारी योग्‍य रितीने पार पाडू शकली नाही. ज्‍यांचे चारित्र्य चांगले नाही अशा लोकांनाही उमेदवारी जाहीर करत आहे. पार्टीमध्‍ये मनमानी सुरु असल्‍याचाही त्‍यांनी आरोप केला.

आपल्‍या समस्‍या आपण योगेंद्र यादव आणि केजरीवाल यांच्‍यासमोर मांडल्‍या होत्‍या मात्र अजूनही समस्‍यांचे निराकरण झाले नाही. केजरीवाल यांनी समस्‍या तसेच चुका मान्‍य केल्‍या असल्‍या तरी त्‍या सुधारण्‍यासाठी काही प्रयत्‍न केले नसल्‍याचेही रमेश यादव यांनी सांगितले.

पुढील स्‍लाइडवर वाचा: योगेंद्र यांना कारणे दाखवा नोटीस...