आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगपती रवी पिल्लई यांच्‍या मुलीच्या विवाहासाठी २० कोटींचा सेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपूरम - दुबईत राहणारे केरळचे उद्योगपती रवी पिल्लई यांनी त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी २० कोटी रुपये खर्च करून ८ एकरमध्ये सेट तयार केला होता. गुरुवारी आरती व आदित्य विष्णू यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यासाठी बाहुबलीचा सेट तयार करणाऱ्या आर्ट डायरेक्टर साबू क्रिल यांनी राजस्थानी संस्कृती दर्शवणारा हा विशेष सेट तयार केला होता.
- बाहुबलीचा सेट क्रिल यांनी अडीच वर्षांत तयार केला होता. तर राजस्थानच्या रॉयल पॅलेसचा सेट ७५ दिवसांत २०० तंत्रज्ञांच्या मदतीने उभारला.
- बाहुबलीचा सेट पाच एकरमध्ये होता. तर विवाह सोहळ्याचा सेट ८ एकरमध्ये उभारला गेला. त्यात ३००० पाहुण्यांची बैठक व्यवस्था होती.
रवी पिल्लई केरळचे राहणारे
एनआरआय रवी पिल्लई यांची आरपी ग्रुप ही कंपनी असून तिची उलाढाल १९, ३०० कोटींची आहे. अाखाती देशांत ग्रुपच्या २६ कंपन्या आहेत. या विवाहावर ५५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शाही लग्‍नसोहळ्याचे फोटो..