Home | National | Other State | Aarushi Talwar And Hemraj Allahabad High Court To Pronounce Verdict Today

अारुषी नव्हे, पुराव्यांची हत्या; आरुषी व हेमराजला मारले कुणी हे 9 वर्षांनंतरही कुणाला माहीत नाही

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Oct 13, 2017, 06:34 AM IST

आरुषी आणि नोकर हेमराज यांच्या हत्येच्या आरोपातून अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दांपत्याची निर्दोष मुक्तता केली. देशातील सर्

 • Aarushi Talwar And Hemraj Allahabad High Court To Pronounce Verdict Today
  नोएडा/अलाहाबाद- आरुषी आणि नोकर हेमराज यांच्या हत्येच्या आरोपातून अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दांपत्याची निर्दोष मुक्तता केली. देशातील सर्वात चर्चित हत्याकांडाचा निकाल देताना हायकोर्ट म्हणाले, सीबीआय तपासात उणिवा आहेत. तिसऱ्याच माणसाने हे हत्याकांड घडवल्याची दाट शक्यता अाहे. या दांपत्याला दोषी ठरवण्याइतपत ना पुरावे आहेत, ना त्या वेळचा घटनाक्रम जुळतो. म्हणूनच संशयाचा फायदा देत डाॅ. राजेश व डॉ. नूपुर तलवार यांना तत्काळ मुक्त करण्याचे आदेश देत आहोत. न्या.व्ही.के. नारायण व न्या. ए.के. मिश्रा यांनी म्हटले आहे की, अशा प्रकरणांत पुरेशा पुराव्याविना सुप्रीम कोर्ट पण इतकी कठोर शिक्षा ठोठावत नाही. या निकालामुळे आता मूळ प्रश्न कायम आहे... मग आरुषी आणि हेमराजला मारले कुणी?
  - तलवार दांपत्याला शिक्षा सुनावणारे सीबीआय जज श्यामलालही कोर्टात होते. निवृत्तीनंतर ते वकिली करत आहेत.
  सीबीआय कोर्टाने क्लोझर रिपोर्ट मान्य केला नव्हता
  - सीबीआय म्हणाली - हत्येच्या वेळी दरवाजा बंद होता. चारपैकी दोघांची हत्या झाली. उरलेले दोघे हेच मारेकरी.
  - हायकोर्टात सिद्ध झाले - दरवाजा उघडाच होता. बाहेरचा कुणी येऊ शकत होता. मद्याच्या बाटल्या पुरावे.
  - सीबीआय म्हणाली - आरुषीवर लैंगिक अत्याचार झाला. पोस्टमाॅर्टेम करणाऱ्या डॉक्टरने साक्ष दिली आहे.
  - हायकोर्टात सिद्ध झाले - डॉक्टरांनी परिस्थितिजन्य निष्कर्षांवरून मत दिले. तो केवळ एक विचार आहे.
  ४ महत्त्वाची कारणे, ज्यामुळे संशयाचा फायदा मिळाला
  उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी डॉक्टरला बोलावून हत्येचा डेमो देण्याचे निर्देश दिले...
  कारण- अारुषी आणि नोकर हेमराज या दोघांची हत्या एका खोलीमध्ये झाली. यानंतर हेमराजचा मृतदेह घराच्या गच्चीवर नेण्यात आल्याचे सीबीआयने सांगितले होते.
  न्यायमूर्तींचा प्रश्न - नोकर हेमराजची हत्या आरुषीच्या खोलीतच झाली असेल तर त्याचे रक्त आरुषीच्या खोलीत का सापडले नाही?
  सीबीआय - हेमराजच्या डोक्याला जिथे मार लागला होता तिथून लगेच रक्त निघत नाही. केसही दाट असल्यामुळे रक्त थांबले.
  - जजनी डॉक्टरला बोलावले. सीबीआयला डेमो देण्यास सांगितले. ते पाहून डॉक्टर म्हणाले, डोक्यात एवढी खोल जखम झाल्यावर रक्त निघालेच पाहिजे होते. म्हणजे खून खोलीत झाला नाही.
  सीबीआयच्या वकिलाने सांगितले मोलकरणीच्या जबाबात ‘समजावले’ऐवजी ‘वाटले’ असे वाचावे

  कारण : घटनास्थळी सर्वात आधी मोलकरीण भारती आली होती. ती प्रथम म्हणाली होती- जे समजावले तोच जबाब देत आहे.

  न्यायमूर्तींचा प्रश्न : भारतीचा खरा जबाब काय होता? आरोपी घटनेनंतर घरीच होता की बाहेर गेला होता, ते यातून स्पष्ट होईल.

  सीबीआय : जबाब लिहिताना गफलत झाली. योग्य जबाब असा होता - मला जे वाटले तो जबाब देत आहे. पहिल्यांदा घटनास्थळी गेल्यावर आम्ही त्याचा व्हिडिओ तयार केला होता.
  - न्यायमूर्तींनी दरवाजा बंद करून मोलकरीण भारती हिला चावी देण्याचा डेमो व्हिडिओ दाखवण्यास सांगितले. मात्र, सीबीआय हा व्हिडिओ सादर करू शकली नाही.
  सीबीआय कोर्टाने क्लोझर रिपोर्ट मान्य केला नव्हता
  २००८ : १५ मे : नोएडा भागातील जलवायू विहारमधील फ्लॅट एल-३२ मध्ये रात्री तलवार दांपत्याची कन्या आरुषी आणि नोकर हेमराजची हत्या झाली.

  २०१० : २९ डिसेंबर : सीबीआयने ही केस ब्लाइंड असल्याचे सांगत क्लोझर रिपोर्ट कोर्टात सादर केला.

  २०११ : ९ फेब्रुवारी: कोर्टाने क्लोझर रिपोर्ट फेटाळून हत्या व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तलवार दांपत्याविरुद्ध खटला चालवण्यास मंजुरी दिली.

  २०१३ : २५ नोव्हेंबर : विशेष सीबीआय कोर्टाने राजेश व नूपुर तलवारला हत्या व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी जन्मठेप सुनावली.

  २०१७ : १२ ऑक्टोबर : हायकोर्टाने ४ वर्षांपूर्वीचा निकाल फेटाळला.
  आरुषि- सुबह की पहली किरण...
  आरुषि- सुबह की पहली किरण, पहली किरण भोर की
  जब आई मेरी दुनिया में गीत बनी वो जीवन की
  बनी इबादत का हिस्सा वो और ज्योति मेरे मन की
  वो उजियारा थी जीवन की, उसको छीना हत्यारों ने,
  अंधियारा बन गई जिंदगी, लुट गई सारी खुशियां वो मेरी
  सपने रह गए अधूरे, सिर्फ बची हैं यादें
  धन्य हुई तुमको पाकर पर, रही अधूरी सब बातें
  जहां भी हो तुम्हें मिले शांति, एक मां की यह है प्रार्थना
  आभारी हूं तेरे प्यार की, अब तू ही है मेरी साधना
  करती हूं तेरी पूजा, तू ही मूरत मेरे मन की
  आरुषि- पहली किरण भोर की
  - तलवार दांपत्याची आज सुटका शक्य
  पुढील काळात २ शक्यता
  - निकाल सीबीआयच्या विराेधात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात अपील केले जाऊ शकते.
  - मुलीच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यावा म्हणून तलवार दांपत्यही सुप्रीम कोर्टात जाऊ शकते.
 • Aarushi Talwar And Hemraj Allahabad High Court To Pronounce Verdict Today
 • Aarushi Talwar And Hemraj Allahabad High Court To Pronounce Verdict Today

Trending