आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरुषी मर्डर केस: HC म्हणाले, हेमराजच्या खूनाबद्दल CBI ने दिलेले कारण बेजबाबदारपणा दर्शवणारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायकोर्टाने म्हटले आहे की, CBI हे सिध्द करण्यात अपयशी ठरली की तलवार दाम्पत्याने पुरावे नष्ट केले. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
हायकोर्टाने म्हटले आहे की, CBI हे सिध्द करण्यात अपयशी ठरली की तलवार दाम्पत्याने पुरावे नष्ट केले. (संग्रहित फोटो)
अलाहाबाद- हायकोर्टाने आरुषी खून प्रकरणात आपल्या निकालात सीबीआय फटकारले आहे. हायकोर्टाने या खून प्रकरणात नोकर हेमराजच्या खूनाबद्दल सीबीआयने दिलेले कारण त्यांचा बेजबाबदारपणा दर्शविणारे असल्याचे म्हटले आहे. कोर्टाने याला अशक्यप्राय कल्पना म्हटले आहे. 
 
CBI पुर्णपणे अपयशी
- हायकोर्टाने आपल्या 273 पानांच्या निकालापत्रात आरुषी आणि हेमराज यांच्या खूनप्रकरणात नूपुर आणि राजेश तलवार यांना निर्दोष ठरवले. नूपुर आणि राजेश तलवार आरुषीचे आई-वडील आहेत. हायकोर्टाने हा निकाल आपल्या संकेतस्थळावर टाकला आहे.
- अलाहाबाद उच्च न्यायालचाचे न्यायाधीस जस्टिस बी. के. नारायणा आणि जस्टिस ए. के. मिश्रा यांनी गुरुवारी तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता करताना म्हटले होते की, सीबीआय न्यायालयाने या प्रकरणात चुकीच्या गोष्टींवर लक्ष दिले आणि कायद्याच्या मुलभूत तत्वांकडे दुर्लक्ष केले.
 
हेमराजच्या खूनाबद्दल काय म्हणाले हायकोर्ट
- हायकोर्टाने म्हटले आहे की, CBI ने दिलेले कारण अयोग्य आहे. हेमराजचा मृतदेह तलवार दाम्पत्याने नष्ट करण्यासाठी ठेवला होता. ही अशक्यप्राय कल्पना आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...