आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aarushi Talwar Was Killed By Her Parents, CBI Officer Tells Court

आई-वडिलांकडूनच आरुषी तलवारची हत्या, सीबीआय अधिका-याचा कोर्टात दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद- देशभरात खळबळ उडवणा-या आरुषी हत्याकांडात सीबीआयकडून मंगळवारी कोर्टात अहवाल सादर करण्यात आला. मुलीचे वडील राजेश आणि आई नूपुर तलवार यांनीच तिची हत्या केल्याचा दावा त्यातून करण्यात आला आहे.

आरुषी हत्याकांड प्रकरणाच्या तपासाची सूत्रे तपास अधिकारी ए.जी.एल. कौल यांच्याकडे असून त्यांच्या मार्फत मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. लाल यांच्यासमोर हा दावा करण्यात आला. सीबीआयचे वकील आर.के. सैनी यांनी ही माहिती सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 2008 च्या 15 आणि 16 मेच्या दिवशी त्यांच्या घरात एखाद्या तिस-या व्यक्तीने प्रवेश केल्याचे पुरावे नसल्याचे तपास अधिका-याकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.