आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम पोलिसांत आंदोलन, कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे म्हणून निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी -आसाममध्येनोकरीत कायम करण्याची मागणी करणाऱ्या विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी सशस्त्र संघर्ष केल्यामुळे पाच जण जखमी झाले. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संघर्षाचे मुख्य केंद्र दिमा हसाव होते. जवळपास ८४० एसपीओंनी शनिवारी दीमा हसाव, लुमदिंग, कोक्राझार, चिरांग बक्सा, बरपेटा, मोरीगाव, नवगाव, होजई आदी शहरातून गुवाहाटीच्या दिशने मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई करून शस्त्र टाकण्यास सांगितले तेव्हा त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. आमच्यापुढे प्रत्युत्तराच्या कारवाईशिवाय पर्याय नव्हता. सर्व ८४० एसपीओकडून शस्त्र काढून घेतली. सरकारने एसपीओना २००८ मध्ये एनएचएआयच्या योजनांमध्ये (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी भरती करण्यात आले होते.
इटानगर - नॅशनलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडच्या (खापलांग) संशयित दहशतवाद्यांनी रविवारी अरुणाचल प्रदेशच्या तिराप जिल्ह्याच्या लाजू भागात आसाम रायफल्सच्या तळावर गोळीबार केला. तीन दिवसांपूर्वी या संघटनेने लष्करी तळावर अचानक हल्ला केला होता. यामध्ये १८ जवान शहीद झाले. तिरापचे पोलिस अधीक्षक अजितकुमार सिंगला म्हणाले, जवळपास ३५ दहशतवाद्यांनी रात्री उशिरा अडीच वाजता हल्ला केला. साधारण १० मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूने गोळीबार झाला. यानंतर दहशतवादी बेपत्ता झाले. घटनास्थळावरून एके-४७ रायफलचे ७० खोके आणि बॉम्ब मिळाले.