आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abdul Karim Tunda Was Planned For Attack On Punjab

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाबमध्ये हल्‍ला करण्‍याची अब्‍दुल करीम टुंडाची होती योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- कुख्यात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा हा बब्बर खालसा ग्रुप प्रमुख वधावासिंग बब्बर यांच्या सतत संपर्कात होता, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दहशतवादी वधावा आणि टुंडादरम्यान आतापर्यंत तीन वेळा बैठका झाल्या होत्या. पाकिस्तानच्या लाहोरपासून काही किलोमीटर अंतरावरील ठिकाणावर या बैठका झाल्याची माहिती टुंडाने चौकशी समितीला दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीची चौकशी करण्यासाठी पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागातील तीन अधिका-यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

इतर दहशतवाद्यांचीही चौकशी होणार: तुरुंगात कैदेत असलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित काही माहिती टुंडाकडून मिळाल्यामुळे पंजाब पोलिस आता त्या कैद्यांचीही चौकशी करणार आहेत. नाभा, संगरूर आणि भटिंडा येथील तुरुंगातील दहशतवादी कैद्यांचा यात समावेश आहे. परंतु कोणकोणत्या दहशतवाद्यांची चौकशी होणार हे मात्र पंजाब पोलिसांनी उघड केले नाही. संपूर्ण माहितीचा उलगडा झाल्यानंतरच त्यांची नावे स्पष्ट करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले आहे.

जर्मनी आणि इटलीशीही होते टुंडाचे संबंध
पंजाबमधील अनेक फरार दहशतवादी जर्मनी आणि इटलीत टुंडाच्या संपर्कात होते. यात बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वधावासिंग बब्बरचे नातेवाईक रेशमसिंग आणि रणजितसिंग यांचा समावेश आहे. रेशमसिंग या दहशतवाद्याने टुंडाची लाहोरमध्ये अनेकदा भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याविषयी भेटीत चर्चा करण्यात आली होती. अमृतसर, जालंधर आणि अन्य काही शहरे त्यांच्या निशाण्यावर होती.