आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhi aish Attends Nita Ambani's Father's Cremation

नीता अंबानींना पितृशोक, अंत्य संस्कारासाठी पोहोचले अभि-ऐश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिलान्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सासरे आणि नीता अंबानी यांचे वडील रवींद्रभाई दलाल यांचे बुधवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. रवींद्रभाई यांचे पार्थिव सर्वप्रथम नीता अंबानी यांच्या परेड रोड येथील घरी आणण्यात आली. तेथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मलबार हिल्स येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्रभाई हे ब्रिर्ला ग्रुपचे माजी सिनिअर एक्झिक्टुटिव्ह होते.

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या हस्ते अंत्यविधी करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्टुटिव्हस आणि बॉलीवूडचे सेलिब्रिटी दाम्पत्य अभिषेक आणि ऐश्वर्या यांची उपस्थिती होती. त्यांनी नीता अंबानी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
फोटो - नीता अंबानी यांचे सांत्वन करताना अभिषेक बच्चन सोबत ऐश्वर्या.