आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त ट्विट : अभिजित, फराह खान यांच्यावर एफआयआर दाखल करा - कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर (बिहार) - येथील एका जिल्हा न्यायालयाने प्रसिद्ध गायक अभिजित आणि ज्वेलरी डिझायनर फराह खान अली यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला शिक्षा झाल्यानंतर रस्त्यावर झोपणा-यांविषयी या दोघांनी ट्विटरवर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सुधीर कुमार ओझा यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली या दोघाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एफआयआर आयपीसीच्या कलम 153, 153-A, 504 आणि 506 या कलमांतर्गत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोघांनी केलेल्या अपमानकारक वक्तव्यांनी वेदना झाल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले आहे.

या प्रकरणी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अभिजित याने वादग्रस्त ट्वीट केले होते. तसेच फराह खान अली हिनेही अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघांनी केलेले वादग्रस्त ट्विट्स...