आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोफण बटालियन स्थापन करा, काश्मिरी दगडफेक्यांना उत्तर देऊ; मध्य प्रदेशातील आदिवासी तरुणांचा सरकारला सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाबुआ - काश्मीरमध्ये लष्करी जवान दगडफेक करणाऱ्यांविरोधात पॅलेट गनचा वापर करतात. याला बऱ्याच दिवसांपासून विरोध होत आहे. लष्कराने त्याऐवजी पावा शेलचाही वापर केला, मात्र त्यात यश आले नाही. अशा स्थितीत मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील तरुणांनी सरकारला आदिवासी गोफण बटालियन तयार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बटालियन म्हणून काश्मीरमध्ये पाठवल्यास संबंधित तरुण दगड फेकणेच विसरून जातील.

गोफण एक पारंपारिक शस्त्र आहे. याचा वापर शेतातील पक्षी उडवण्यासाठी केला जातो. यामुळे ४०० ते ५०० मीटरपर्यंत निशाणा साधता येतो. यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. झाबुआचा रहिवासी भानू भूरिया म्हणाला, काश्मिरी दगडफेक्यांचा सामना करण्यासाठी सरकारने पॅलेट गनचा वापर केला नाही तर त्याला पर्याय गोफण आहे. आम्ही झाबुआचे आदिवासी गोफनच्या साहाय्याने त्यांचा यशस्वीपणे सामना करू शकतो. यासाठी सरकार आदिवासी गोफण बटालियन तयार करू शकते.

टीव्हीवर पाकिस्तान पुरस्कृत काही व्यक्ती दगडफेक करताना दिसल्यावर जवानांची हतबलता दिसते आणि आम्ही निराश होतो. खातरसिंह व थावरसिंह हे तरुण म्हणाले, जवानांवर रोज दगडफेक होत असल्याचे पाहून आमचे रक्त सळसळते. आदिवासी तरुण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतात. यामुळे येथील तरुणांना रोजगार मिळेल आणि राष्ट्रकार्यही होईल. उदय बिलवाल म्हणाले, सुरक्षेसाठी गोफण पगडी किंवा बेल्टप्रमाणे बांधून फिरत असतो.

हाताने फेकलेल्यापेक्षा गोफणचा दगड जातो चार-पाच पट लांब
गोफण प्राचीन काळापासून आदिवासी समाज सुरक्षेसाठी वापरले जाते. दोरी दोन्ही बाजूने जोडून ती बनवली जाते. खालच्या बाजूस दोरीच्या मधोमध दगड ठेवला जातो. यानंतर दोरीचा दुसरा भाग हाताने फिरवून निशाणा साधला जातो. गोफणीमध्ये ठेवलेला दगड हाताने फेकलेल्या दगडाच्या तुलनेत चार ते पाचपट वेगाने आणि लांब अंतरावर पडतो. निशाणा अचूकही असतो.
बातम्या आणखी आहेत...