आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी बाबाच्या खास विषकन्या, अय्याशीसाठी असे करायच्या सुंदर तरुणींना तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेऱ्यातून रहस्य समोर येत आहेत. बाबा तरुणींचा कसा वापर करायचा याची माहिती उघड झाली आहे. (सिम्बॉलिक इमेज) - Divya Marathi
डेऱ्यातून रहस्य समोर येत आहेत. बाबा तरुणींचा कसा वापर करायचा याची माहिती उघड झाली आहे. (सिम्बॉलिक इमेज)
रोहतक/नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बलात्कारी राम रहीम सध्या तुरुंगात 20 वर्षांच्या कैदेची शिक्षा भोगतोय. त्याच्या कुकर्मांचे रोज नवनवे खुलासे होत आहेत. 750 एकरांवर पसरलेल्या बाबाच्या डेऱ्यामध्ये राहणाऱ्या तरुणींना साध्वी तसेच शाही मुली म्हटले जायते. परंतु, खूप कमी लोकांना हे माहिती आहे की, या तरुणींत काही विषकन्याही सामील होत्या, ज्यांचे काम राम रहीमच्या बेडसाठी इतर तरुणींना तयार करण्याचे होते.
 
तरुणपणीची बाबाची वासना...
- वास्तविक, या दलात स्वत: बाबाच्या वासनेची शिकार ठरलेल्याच तरुणी सामील व्हायच्या.
- या महिलांचे वय होत आल्यावर राम रहीम त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायचा.
- या बदल्यात त्या राम रहीमच्या बेडवर जाण्यासाठी दररोज नवीन-नवीन तरुणींना तयार करायच्या.

असे व्हायचे सिलेक्शन
- डेऱ्याशी निगडित एका अनुयायाने सांगितले की, डेऱ्यात येणाऱ्या प्रत्येक तरुणीवर या विषकन्यांची नजर होती.
- अशिक्षित आणि सुंदर तरुणींना हेरून त्यांना प्रशासनाकडून 'खास' काम दिले जायचे. यात बाबाची साज-सज्जापासून ते बाबाचा बेड सजवण्यापर्यंतचे काम असे.
- सर्वात सुंदर तरुणींना डेऱ्यातील शाळेत शिकवण्याचे किंवा इतर आणखी चांगल्या कामावर ठेवले जाई.
- त्यांना इतर साध्वींत मिसळू देत नसत. बाबाच्या बेडवर जाण्यासाठी सतत त्यांचे ब्रेन वॉश केले जायचे.
- विषकन्या या सुंदर तरुणींना गर्ल्स होस्टेलच्या अशा खोलीत ठेवायच्या, जेथे बाबाच्या गुहेचा गुप्त मार्ग होता.
- रात्रीच्या वेळी एका तरुणीला निवडून तिला त्याच गुप्त मार्गाने बाबाच्या गुहेत पाठवले जायचे. आणि मग पुढे बाबा त्यांचे शोषण करायचा.
 
तोंड उघडल्यावर टॉर्चर
- एखाद्या साध्वीने बाबा राम रहीमच्या विषकन्यांबाबत काही चुकीचे बोलले तर तिचा अमानुष छळ- टॉर्चर केले जायचे.
- पहिल्या चुकीवर संबंधित तरुणीला 24 तास उपाशी ठेवले जायचे. दुसऱ्यांदा चूक झाल्यास तिला टॉर्चर रूममध्ये नेऊन बेदम मारहाण केली जायची.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...