आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS मध्ये सहभागी भारतीय तरुणांसाठी नरमाईची भूमिका घेण्याचा मोदी सरकारचा विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : आरीफ मजीद कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

नवी दिल्ली - मोदी सरकार दहशतवादाच्या विरोधात कडक भूमिका असल्याचे वारंवार सांगत आहे. मात्र इराकमध्ये ISIS या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झालेल्या भारतीय तरुणांबाबत सरकार मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची शक्यता आहे. इराकहून परतल्यानंतर अशा युवकांच्या विरोधात एफआयआर दाखल केले जाऊ नये याबाबत गृहमंत्रालय विचार करत आहे. एनआयएने ISIS च्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तुरुंगात पाठवण्याऐवजी या तरुणांची कट्टर विचारसरणी बदलली जावी असे गृह मंत्रालयाचे मत आहे. एफआयआर दाखल होण्याच्या भीतीने हे तरुण परतणारच नसल्याची शक्यता आहे. तसेचस पालकही पोलिसांना माहिती देणार नाही, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
विचारसरणी बदलणार
गृह मंत्रालयाच्या एका अधिका-याच्याने या प्रकरणात एफआयआरची कशी मदत होऊ शकते याचा सगळ्या पातळ्यांवर विचार सुरू आहे. कायद्यानुसार सांगायचे तर या तरुणांनी भारतात काहीही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे भारतात आल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची कट्टर विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करण्याबाबत विचार सुरू आहे.
18-20 भारतीय युवक सहभागी
गुप्तचर यंत्रणांना अशी शंका आहे की, इराकमध्ये ISIS मध्ये सहभागी होऊन लढणा-यांची संख्या सुमारे 18 ते 20 आहे. त्यापैकी ठाण्यातील आरिफ मजीद याच्या नातेवाईकतांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यांनी गृहमंत्र्यांना या तरुणांना वाईट मार्गावर घेऊन जाणा-यांवर कारवाई करण्याची विनंती केली. माजीदचा इराकमध्ये मृत्यू झाला असल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
तरुणांचे ब्रेनवॉश कोणी केले
गृहमंत्र्यांनी नुकतेच एखा पत्रकार परिषदेत ISIS चा फुगा मिडियाने फुगवला असल्याचे म्हटले होते. भारतीय मुस्लीम आयएसआयएसच्या विरोधात आहेत. त्यामुळे ते मोठ्या संख्येने या दहशतवादी संघटनेत सहभागी होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनआयएने संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमानुसार गृह मंत्रालयाकडे ISIS च्या विरोधात एफआयआर दर्ज करण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर या तरुणांना अटक करण्यापेक्षा अधिक त्यांचे ब्रेन वॉश कोणी केले आणि कोणी इराकला पाठवले याचा तपास घेणे गरजेचे असल्याचे गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने म्हटले आहे.

पुढील स्लाइड्सवर पहा, ISIS मध्ये सहभागी झालेले तरुण...