आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी संकटात आहे...\' हेच ठरले शहीद अमरजीत बलिहार यांचे अंत‍िम वाक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- ‘नक्षलवाद्यांनी आमच्या वाहनांवर हल्ला केला आहे. आम्हाला त्यांनी घेरले आहे. मी संकटात आहे,' असे शहीद अमरजीत बलिहार यांचे अंत‍िम वाक्य ठरले, असे अमडापाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी रंजीत मिंज यांनी सांगितले.

नक्षलवादी हल्ला होण्यापूर्वी बलिहार यांचे त्यांच्या कुटुंबियांशी फोनवर बोलणे झाले होते. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला चढवला तेव्हा अमडापाडा पोलिस ठाण्‍याचे प्रभारी रंजीत मिंज यांच्याशी बलिहार बोलत होते. 'मी संकटात आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली होती. परंतु त्यानंतर गोळीबाराचा आवाज आला आणि फोन बंद झाला. असेही मिंज यांनी सांगितले.

दरम्यान, नक्षलवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात झारखंडमधील पाकूड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अमरजीत बलिहार यांच्यासह पाच पोलिस शहीद झाले.

अमरजीत बलिहार 15 दिवसांपूर्वीच रांची येथे आले होते. आई-वडिल, मुले आणि पत्नीसोबत काही दिवस घालवल्यानंतर ते परतले होते. काही वर्षे ते रांचीमध्येच होते.

जहानाबाद येथे झाली पहिली पोस्टिंग ...
14 ऑक्टोबर 1960 मध्ये जन्मलेल्या अमरजीत यांनी 1983 मध्ये एमएची पदवी घेतली होती. सन 1986 मध्ये बीपीएस्सी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी डीएसपी झाल्यानंतर अमरजीत यांना पहिली पोस्टिंग जहानाबाद येथे झाली होती. त्यांनी मुंगेर, खूंटी, जहानाबाद, पाटणा, राजगीर, हवेली खडगपूर, लातेहार, चक्रधरपूर आणि पुन्हा रांची येथे त्यांनी सेवा दिली. गेल्या मे महिन्यांत पाकुड जिल्ह्याच्या पोलिस निरीक्षकपदी त्यांना बढती मिळाली होती.

शहीद एसपी अमरजीत यांच्याबाबत अधिक माहितीसाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...