आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Absconding Boyfriend Held Over Malayalam Tv Serial Actress Death

दाक्षिणात्य अभिनेत्रीचा मृत्यू, बॉयफ्रेंडला अटक; नदीकिनारी सापडला मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - शिल्पा - Divya Marathi
फाइल फोटो - शिल्पा
तिरुवनंतरपूरम - दाक्षिणात्य अभिनेत्री शिल्पाचा काही दिवसांपूर्वीच करनामा नदी किनारी मृतदेह सापडला होता. 19 वर्षीय या अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या 23 वर्षांच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. शिल्पाने टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनूसार, शिल्पाच्या मृत्यूआधी आरोपी लिजन तिच्यासोबत आढळून आला होता. 18 जुलैला तिचा मृतदेह नदी किनारी सापडला होता. तेव्हापासून लिजन फरार होता. त्याच्या अटकेनंतर या मृत्यूचे गुढ उकलण्यास मदत होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

टीव्ही आणि चित्रपटांतून मिळाली ओळख
शिल्पाने मल्याळम टीव्ही मालिका चंदनमाझा, सौभाग्यवती, मेघसंदेशम आणि प्रनयममध्ये काम केले होते. त्याशिवाय तिने जीतू भाई एना चॉकलेट भाई, मिनीमोलूड अचन आणि कालिदासन कविता इझुथुकायनू यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. फार कमी वयात ती नावारुपाला आली होती.

कुटुंबीय काय म्हणतात
शिल्पाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे, की ती आत्महत्या करु शकत नाही नक्की तिचा खूनच झाला असला पाहिजे. तिच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे, की ती एका मुलीसोबत तिच्या मित्राच्या घरी गेली होती. संध्याकाळी त्या मुलीने फोन करुन सांगितले की शिल्पा नाराज होऊन कुठेतरी निघून गेली आहे आणि तिने तिचा फोन देखील सोबत नेला नाही. त्यानंतर माहिती मिळाली की करनामा नदीच्या किनारी तिचा मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनूसार पाण्यात बुडाल्यामुळे शिल्पाचा मृत्यू झाला. मात्र संशयाची सुई लिजनकडेच आहे. कारण या घटनेनंतर तो त्याच्या कुटुंबीयांसह फरार झाला होता. शिल्पाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे, की तिचे एका मुलीसह दोन मुलांसोबत भांडण झाले होते. त्यात लिजन देखील होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत फोटो