आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

54 आयएएस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा, ध्वजारोहणाला अनुपस्थित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेेहराडून - स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल उत्तराखंडमधील ५४ आयएएस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ज्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यात प्रधान सचिव आणि अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
 
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाला उपस्थित न राहिल्याबद्दल उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच असे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. ध्वजारोहण समारंभाला अनुपस्थित का राहिले याचे स्पष्टीकरण लवकरात लवकर द्यावे, असा आदेश मुख्य सचिव एस. रामास्वामी यांनी या अधिकाऱ्यांना दिला आहे.
 
डेहराडूनच्या परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला होता. रावत यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले होते. त्या वेळी अनेक वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने मुख्यमंत्र्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अधिकारी का उपस्थित राहिले नाहीत याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून मागावे, तसेच समाधानकारक कारण न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आपापल्या भागात ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अशाच कारणे दाखवा नोटिसा बजावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांंना देण्यात आला आहे. अनुपस्थितीबद्दलचे योग्य कारण न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात तशी नोंद करावी, असेही सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...