पाटणा- येथील बेली रोडवर एका जवानाला पोलिस रोखत होते पण तो असे काही करत होता की ज्यामुळे पोलिसाच्या प्रतिमेला तडा जात होता. महिला पोलिसही या जवानाला रोखण्याचे प्रयत्न करत होते पण तो त्यांचेही ऐकत नव्हता. त्याने एका मुलीला अशा पध्दतीने पकडून ठेवले होते की त्याच्या ताब्यातुन सुटूच शकत नव्हती.
री-चेकिंगसाठी सुरु होती निदर्शने
- दहावीच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिकांची री-चेकिंग करावी या मागणीसाठी डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना निदर्शने करत होत्या. त्यावेळी पोलिस आणि निदर्शकांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी यावेळी लाठीचार्जही केला.
- यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला पोलिस कर्मचारी विद्यार्थींना आडवत होत्या तर पुरुष पोलिस कर्मचारी विद्यार्थ्यांना आडवत होते.
- एका पुरुष पोलिस कर्मचाऱ्याने मात्र एका मुलीला विचित्र पध्दतीने पकडून ठेवले होते.