मेरठ- एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य मेरठ महाविद्यालयातील एका विद्यार्थी नेत्याने केले आहे. दुष्यंत तोमर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मेरठ महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष होता. तोमर यांनी म्हटले की, 'ओवेसींनी भारत मातेचा अपमान केला आहे. या आधीही त्यांनी कित्येक वेळा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.' खासदारकी रद्द करण्यात यावी..
- मंगळवारी दुष्यंत तोमर यांनी ओवेसी यांच्याविरोधात निदर्शने केली.
- ओवेसी यांचे वक्तव्य देशाची एकता आणि अखंडतेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.
- तोमर म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाने भारत माता की, जय म्हणायला हवे.
- एबीव्हीपीचे नेता विजेंद्र राणा यांनी ओवेसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
ओवेसींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..
- मेरठ कॉलेजच्या शताब्दी द्वाराजवळ मंगळवारी विद्यार्थ्यांनी दुष्यंत तोमर यांच्या नेतृत्वात ओवेसींविरोधात निदर्शने केली.
- एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ओवेसींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
- या आंदोलनात एबीव्हीपीशी जुळलेले विद्यार्थी समर त्यागी, सुमित, अमित, मनीष सिंह, कुलदीप आणि मोहित भाटी आदी उपस्थित होते.