आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACBचा छापा: आठवी पास सरकारी कर्मचाऱ्याकडे 20 फोरव्हिलर्स आणि तीन फार्म हाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जुन यादवकडे 20 चारचाकी गाड्या असल्याचे छापेमारीत उघड झाले. त्यापैकी सर्वाधिक ट्रक आहेत. - Divya Marathi
अर्जुन यादवकडे 20 चारचाकी गाड्या असल्याचे छापेमारीत उघड झाले. त्यापैकी सर्वाधिक ट्रक आहेत.
रायपूर - अँटी करप्शन ब्यूरोने (ACB) राज्यातील वेगवेगळ्या खात्यातील आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर 13 ठिकाणी छापेमारी केली. राज्यातील काही अधिकाऱ्यांकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती. रायपुर, बिलासपुर, रायगड, जांजगीर, अंबिकापुर यासह आणखी काही ठिकाणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

20 गाड्या, 3 फार्म हाऊसचा मालक, वेतन 7 ते 10 हजार रुपये
- एसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कारवाईत सर्वात आश्चर्यजनक माहिती अर्जुन यादवच्या संतर्भातील समोर आली आहे.
- आठवी पास आणि 7 ते 10 हजार रुपये मासिक वेतन असलेल्या या सहकार खात्यातील सुपरवाझरकडे 20 फोरव्हिलर्स आणि तीन फार्महाऊस असल्याचे तपासात उघड झाले.
- अर्जुन यादवच्या अकलतरा (जांजगीर) येथील ठिकाण्यावर छापेमारी करण्यात आली. येथे त्याचा कोट्यवधींच्या काळ्या संपत्तीचा उलगडा झाला.
- एसीबीकडून आकडेवारी जाहीर झाल्यानंतर हे आकडे वाढू शकतात.

येथेही झाली छापेमारी
- रायगड जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी एन.के.द्विवेदी यांच्या सरला व्हिला येथे एसीबीने छापा टाकले तेव्हा ते फरार झाले. त्यांच्या बिलासपूर येथील घरी छापेमारी झाली.
- अंबिकापूरचे पीडब्ल्यूडीचे एक्झिकेटिव्ह इंजिनिअर फेबियान खेस यांच्या घरावर छापा पडला. त्यांची पत्नी सुषमा खेस रायगड येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आहे.
- रायगडमधील शाहिद अली आणि बिलासपूरचे निवृत्त अन्न व औषधी इन्स्पेक्टर गुलाम मोहम्मद यांच्या घरी एसीबीने छापा टाकला.
- गुलाम मोहम्मद दोन पेट्रोलपंपाचे मालक असल्याचे उघड झाले. त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरही उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.
- बिलासपूरमधील जिल्हा परिषदेचे प्रोजेक्ट ऑफिसर आनंद पंड्या, कोरियाचे जलसिंचन विभागातील एक्झिकेटिव्ह इंजिनिअर यू.एस. राम यांच्या घरावरही एसीबीचा छापा पडला.
- रायपूरच्या सुंदरनगर येथे पटवारी मिथिलेश पंड्या यांच्या घरीही एसीबीचे अधिकारी धडकले. या सर्वांच्या घरातून काय-काय मिळाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो