आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accountant Suicide Imposed Officer Guilty Sonbhadra Uttar Pradesh

\'शरीराचा एक भाग एसडीएमला, दुसरा तहसीलदाराला पाठवा\'; सरकारी लेखपालाची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो:रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछिन्न झालेला सरकारी कर्मचार्‍याचा मृतदेह)

वाराणसी- सोनभद्र जिल्ह्यात एका सरकारी कर्मचार्‍याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. अशोक चौबे असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते लेखपाल या पदावर कार्यरत होते. आपल्या आत्महत्येस तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (एसडीएम) जबाबदार असल्याचे चौबे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

'रेल्वेखाली आत्महत्या करून मी माझ्या शरीराचे दोन तुकडे करत आहे. डोक्यापासून कमरेपर्यंतचा भाग एसडीएमला तर कमरेपासून पायाचा भाग तहसीलदारला भेट म्हणून द्यावा,' असे या चौबे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतिरहा येथील रहिवासी असलेले अशोक चौबे हे कनहर तहसिल कार्यालयात लेखपाल या पदावर कार्यरत होते. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर कामाचे दडपण टाकत असून आपला मानसिक छळ करत असल्याचे चौबे यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्यामुळे कामाचा वाढता व्याप आणि त्यात अधिकार्‍यांनी चौबे यांची बदली केली हो्ती. म्हणून चौबे यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी बोलणे टाळले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, अशोक चौबे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जशीच्या तशी...