आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accused Disclosed Incident Of Gohana Bank Robbery Case

PNB बॅँक चोरी : छतावरुन लॉकररूमपर्यंत पोहोण्याचा केला होता प्रयत्न, रचले अनेक कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- पोलिसांच्या ताब्यात असलेले चोरी करणारे आरोपी

सोनीपत - गोहना येथे झालेल्या पीएनबी बॅँकेच्या चोरी प्रकरणात नव-नवीन खुलासे समोर येत आहेत. कोणत्याही प्रकारे बॅँकेच्या लॉकरपर्यंत पोहोचायचे हा चोरांचा मुख्य प्रयत्न होता. यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळे कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉकरपर्यंत पोहोचण्यासाठी चोरांडकडून छतावरून आतमध्ये उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, भुयार खोदून तिथपर्यंत पोहोचण्याचा कट अधिक सुरक्षित वाटल्याने त्यांनी हा कट आमलात आणल्याचे सांगितले. ज्या इमारतीमध्ये बॅँक आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर एलआयसीचे कार्यालय आहे. विशेष म्हणजे दोन्ही कार्यालयांडमध्ये रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक नसतो याची माहिती चोरांना होती.

धोका अधिक होता
बॅँकेचे कार्यालय चारही बाजूंनी मोकळे आणि मुख्य रोडवर असल्याने छतावरून आत उतरणे धोक्याचे होते. चोरी करण्यासाठी चोरांकडून खिडकी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्यांनी चोरी करण्यासाठी अनेक कट रचले.
भुयार बंद करण्याचे काम सुरू
ज्या भुयारातून चोरांनी बॅँकेत प्रवेश केला होता ते बंद करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शनिवारी प्रशासनातर्फे सीसीपासून तयार करण्यात आलेले लेंटर तोडण्याचे काम सुरु होते. या भागातील वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.

मुख्य आरोपीकडून रोकड आणि बंदूक जप्त
मुख्य आरोपी सतीशकडून पोलिसांनी 50 हजार रुपये रोकड एक देशी बंदूक आणि दोन काडतूस जप्त केले आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी राजेश सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेतला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, 5 दिवसांनंतर पोहोचले हुड्डा...