आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजीनेच तुरुंगातून रचला डान्सर-सिंगर हर्षिताच्या खुनाचा कट, पोलिस चौकशीत केले कबूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - हरियाणवी डान्सर- सिंगर हर्षिता दहियाचा खून तिचे भावजी दिनेश कराला यांनीच घडवला होता. पोलिस चौकशीत त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी बुधवारी दिनेशला पोलिस प्रोटेक्शन वॉरंटवर झज्जर जेलमधून आणले होते. यानंतर कोर्टात सादर करून 4 दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. तथापि, हरियाणवी डान्सर-सिंगर हर्षिताचा 17 ऑक्टोबर रोजी गोळी झाडून खून करण्यात आला.
- पानिपतच्या इसराना पोलिसांतील एसएचओ नवीन संधु यांच्या मते, चौकशीत दिनेशने कबूल केले, त्यानेच तुरुंगात बसून हर्षिताच्या खुनाचा कट रचला होता. त्याचे म्हणणे होते की, हर्षितामुळेच त्याच्यावर बलात्कार, तिच्या आईचा खून असे गुन्हे दाखल झाले होते. हर्षिता या सर्वात मुख्य साक्षीदार होती.
 
खुनासाठी गुन्हेगारांशी बोलला
- दिनेशने हर्षिताला संपवण्यासाठी अनेक गुंडांशी बोलणे केले होते. तथापि, त्याने हे अजून सांगितले नाही की, खून नेमका कोणी केलाय?
- पोलिस आता त्या सर्व गुंडांबाबत दिनेशकडे चौकशी करत आहेत.
 
हर्षिताच्या बहिणीने केला होता खुनाचा आरोप...
हर्षिताची थोरली बहीण लताचे करालात आणि मधली बहीण मीनूचे बिजवासनमध्ये सासर आहे. आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर हर्षिता नरेलामध्ये मावशीकडे राहायला आली होती. दिनेशच्या भीतीने बहिणींनी हर्षिताशी संबंध तोडले होते. उदरनिर्वाहासाठी हर्षिता नृत्य आणि गायन करायची. यात तिला भरपूर यशही मिळाले आणि दिनेशविरोधात थेट लढा देण्याचे बळही मिळाले. दिनेश हर्षिताला फेसबुकवरून वारंवार धमकी द्यायचा, हे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. तथापि, या प्रकरणात आणखी गूढ शोधण्यासाठी हरियाणा पोलिस तपास करत आहेत. हत्या होऊन दोन दिवस उलटूनही अद्याप पोलिस कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाहीत.
 
दिनेशवर दिल्लीमध्ये ६ गुन्हेगारी खटले सुरू
दिनेशवर हर्षिताची आई प्रेमो यांची हत्या, हर्षितावर बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाचे ६ खटले दाखल आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अद्याप कोणत्याही खटल्यात त्याला शिक्षा झाली नाही.
 
हर्षितानेही दिनेशवर झाडली होती गोळी
दिनेशच्या धमक्यांना त्रासून तसेच बलात्काराचा वचपा काढण्यासाठी २०१४ मध्ये हर्षिताने दिनेशवर गोळी झाडली होती. त्यात तो थोडक्यात बचावला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी हर्षिताविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...