आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accused Of Attacking Maluka, 65 Yr Old Arrested From Hospital

मंत्र्यासोबत वाद घालणाऱ्या वृद्धाला स्ट्रेचरवरच अटक, अजून उपचाराची गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृद्धाला स्ट्रेचरवरून अटक करताना पोलिस. - Divya Marathi
वृद्धाला स्ट्रेचरवरून अटक करताना पोलिस.
फरीदकोट - पंजाबचे शिक्षण मंत्री सिकंदरसिंग मलुका यांच्‍याशी वाद घालून त्‍यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनरैलसिंग (65) या वृद्धाला पोलिसांनी शनिवारी फरीदकोट येथील गुरू गोविंदसिंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयातून अटक केली. दरम्‍यान, रुग्‍णालयातून सुटी झाल्‍याच्‍या पत्रावर पोलिसांनी स्‍वत: जबरदरस्‍तीने जनरैलसिंग यांचा अंगठा घेतला आणि त्‍यांना रुग्‍णवाहिकेमध्‍ये टाकून पोलिस ठाण्‍यात नेले. त्‍यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण
'गुरु ग्रंथ साहिबा' या पवित्र ग्रंथाची पाने समाजकटंकाडून फाडण्‍यात आल्‍यानंतर पंजाबमध्‍ये हिंसाचार घडला. दरम्‍यान, आठ दिवसांपूर्वी हमीरगड गावात सुरू असलेल्‍या एका सभेत यातूनच मंत्री सिकंदरसिंग मलुका यांना जरनैलसिंग यांनी धापड मारली. त्‍यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्‍थळावरच जरनैलसिंग यांना बेदम मारहण केली. यात ते बेशुद्ध झाले. त्‍यानंतर त्‍यांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले.
मंत्र्याच्‍या पीएने दिली तक्रार
जरनैलसिंग यांच्‍या विरुद्ध मंत्र्याच्‍या पीएने शासकीय कामात अडथळा आणल्‍याची तक्रार दयालपुरा पोलिस ठाण्‍यात दिली. त्‍या आधारे पोलिसांनी त्‍यांना अटक केली.
पोलिसांसह डॉक्‍टरवरही लावले आरोप
आपली प्रकृती गंभीर असताना डॉक्‍टरांनी पोलिसांच्‍या दबावाखाली येत आपल्‍याला रुग्‍णालयातून सुटी झाल्‍याचे पत्र दिले. मात्र, आपल्‍याला अजूनही वेदना होत आहे. त्‍यामुळे उपचाराची गरज आहे, असा आरोप जरनैलसिंग यांनी केला.
जरनैलसिंग ठणठणीत : डॉक्‍टर
वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. पी. सिंग म्‍हणाले, ''आम्‍ही कुणाच्‍याही दबावात जरनैलसिंग यांना सुटी दिलेली नाही. त्‍यांची प्रकृती आता ठणठणीत आहे'', अशी प्रतिक्रिया त्‍यांनी दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...