आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारदा घोटाळ्यातील आरोपी घोष यांचा आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र संग्रहित )

कोलकाता- तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले राज्यसभा सदस्य कुणाल घोष यांनी शुक्रवारी झोपेच्या ५० हून अधिक गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांचा धोका टळला आहे. कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्यातील ते आरोपी असून कोलकात्यातील प्रेसिडन्सी तुरुंगात कैद आहेत.

या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने तुरुंग अधीक्षक आणि डॉक्टरांसह तीन जणांना निलंबित केले आहे. त्यावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. गृहसचिव वासुदेव बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील समिती घटनेचा तपास करेल. घोष यांच्यावर उपचार सुरू आहेत.
"मृत्यू व्हावा असे राज्य सरकारला वाटते'
भाजप, काँग्रेस, माकपने राज्य सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप लावला आहे. घोष यांचा मृत्यू व्हावा, हेच राज्य सरकारला वाटते. यातून चिट फंडमध्ये अडकलेले पक्षातील इतर कोणतेही पदाधिका-यांचा चेहरा समोर येऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी केला आहे.