आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नी, सासू-सासर्‍यासह सात नातेवाइकांवर अॅसिड हल्ला, पती अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मेरठमध्ये अॅसिड हल्ल्यात गंभीर भाजली गेलेली एक महिला)
मेरठ- उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका माथेफिरूने पत्नी, सासू-सासर्‍यांसह सात जणांवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमधील लिसाडी भागातील शौकीन गार्डन कॉलनीत गुरुवारी रात्र‍ी उशीरा घडली. आरोपी साजिदने घराच्या छतावर झोपलेली पत्नी, सासु-सासरे आणि मेव्हणीसह सात जणांवर अॅसिड हल्ला केला. यात सातही जण गंभीर भाजले गेले आहेत. जखमींवर मेरठ मेडिकल महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी साजिदसह त्याच्या साथीदाराला अटक केली आहेत.

पत्नीला ठार मारण्याची धमकी द्यायचा साजिद
आरोपी साजिद खरखौदा पीपलीखेडा गावातील रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी उजमा हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. साजिद आपल्या पत्नीला वारंवार ठार मारण्याची धमकी द्यायचा. तिला मारहाणही करायचा, असा आरोप उजमाचे वडील निसार यांनी केला आहे.

पतीच्या जाचाला कंटाळून उजमा माहेरी निघून आली होती. उजमा हिने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. पोलिसांत तक्रार दिल्यावरून साजिद सासरी येऊन पत्नीसह सासू-सासर्‍यांना ठार मारण्याची धमकी देत होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित छायाचित्रे....