आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजीनिअर चितरंजन बनला अॅसिड हल्ल्यातील पीडित सोनालीच्या जीवनाचा साथीदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहप्रसंगी कोर्टात सोनाली आणि चितरंजनसोबत सोनालीचा भाऊ-वहिनी - Divya Marathi
विवाहप्रसंगी कोर्टात सोनाली आणि चितरंजनसोबत सोनालीचा भाऊ-वहिनी
बोकारो (झारखंड)- अॅसिड हल्ल्यात पूर्णपणे भाजलेल्या युवतीशी विवाह करून उच्चशिक्षित युवकाने समाजासमोर आदर्श उभा केला आहे. बोकारोच्या सोनाली मुखर्जी या युवतीवर 2003 मध्ये अॅसिड हल्ला झाला होता.
त्या हल्ल्यात सोनालीच्या चेहऱ्या व्यतिरिक्त शरीराचा बराचसा भाग जळाला होता. त्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या सोनालीने आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे.

सोनालीचा हा संघर्ष 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या सहाव्या पर्वात पडद्यावर दाखवण्यात आला. त्यानंतर तिच्या मदतीसाठी अनेक लोक धावून आले. ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये एका खासगी कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेला चित्तरंजन तिवारी हासुद्धा याच लोकांपैकी एक. मात्र, त्याने तिला मदत करता थेट आपल्या जीवनाचा साथीदार बनवण्याची इच्छा सोनालीपुढे व्यक्त केली. महिन्यांपूर्वी चित्तरंजनने सोनालीपुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. तिने सहमती दर्शवल्यानंतर लग्नाची बोलणी पूर्ण झाली.

आनंदाचे वातावरण
बुधवारी नोंदणी पद्धतीने विवाह करत सोनाली आणि चित्तरंजनने त्यांच्या संसाराला सुरुवात केली. शारीरिक व्यंग असलेल्या स्थितीत चित्तरंजनने तिचा स्वीकार केल्याचा आनंद आणि अभिमान सोनालीच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. या आनंदाचा उत्सव सोनालीच्या घरातच नव्हे तर ती नोकरीला असलेल्या कार्यालयातही साजरा करण्यात आला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, चित्तरंजन आणि सोनालीच्या विवाहाची फोटो....
(फोटोग्राफर: राजेश देव)