आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार लिंकसाठी कंपन्यांनी मेसेज पाठवून भीती घालू नये : सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आधार क्रमांक लिंक करण्यासाठी बँक आणि संबंधित टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये आधार लिंकसाठी अंतिम मुदतही सांगावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरकारच्या या निर्णयावर तात्पुरती स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. शिवाय, आधारसंबंधी आदेशाची घटनात्मक वैधता व बँक खाते, मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ४ याचिकांवर केंद्र सरकारकडून उत्तर मागवले आहे. या प्रकरणांची सुनावणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घटनापीठ करेल, असेही कोर्टाने नमूद केले. कंपन्यांनी ग्राहक व बँक खातेदारांना सतत मेसेज पाठवून त्यांना भीती घालू नये, अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिली.
 
काय आहे प्रकरण
आधार प्रकरणात कल्याणी मेनन सेन आणि इतर तिघांनी याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टात हजर झालेल्या कल्याणी यांनी २३ मार्चला ‘सर्व नागरिकांना आपले मोबाइल क्रमांक आधारला लिंक करावे लागतील’ या दूरसंचार खात्याच्या परिपत्रकाला आव्हान दिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारच्या या नियमामुळे लोकांच्या खासगीपणाच्या हक्कांचे उल्लंघन होते. यामुळे असे करणे घटनाबाह्य अाहे. ३० ऑक्टोबरला सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आधारशी निगडित प्रकरणांची सुनावणी घटनापीठच करेल, असे सांगितले होते.
 
कोर्ट रूम लाइव्ह
 
याचिकाकर्ता  सरकार कधी ३१ डिसेंबर, कधी ३१ मार्च अशा मुदतीच्या गोष्टी करते. याबाबत स्पष्टता असावी.
सरकार : न्या. कृष्णा समितीचा अहवाल मार्चपर्यंत येईल. म्हणूनच ३१ मार्च तारीख सांगितली जात आहे. (याचिकाकर्त्यांचे म्हणणे श्याम दिवाण, अरविंद दातार, आनंद ग्रोव्हर व के. व्ही. विश्वनाथन यांनी तर केंद्र सरकारचे म्हणणे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगाेपाल यांनी मांडले.)
याचिकाकर्ता : बँक खाते व मोबाइल क्रमांक आधारशी जोडले नाहीत तर दोन्ही बंद केले जातील, असे मेसेज सतत पाठवले जात आहेत. यामुळे भीतीचे वातावरण आहे. ज्यांची खाती ३०-४० वर्षांपासून आहेत त्यांच्यावर मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये कारवाई होऊ शकते.
अॅड. वेणुगोपाल : सतत मेसेज पाठवले जात असल्याचे म्हणणे खरे नाही.
न्या. सिकरी : कोर्ट रूममध्ये मीडिया पण आहे. मी सांगणार नव्हताे, असे मेसेज मलाही येत आहेत. मोबाइल कंपन्या आणि बँकांनी असे मेसेज पाठवून भीतीचे वातावरण तयार करू नये. मेसेजमध्ये बँक खाते लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१७ आणि मोबाइल क्रमांकासाठी ६ फेब्रुवारी २०१८ आहे हे स्पष्ट सांगा.
याचिकाकर्ता : सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत बँक खाती आधारशी लिंक करण्याची मुदत निश्चित केली आहे. आता शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे की, ही तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवली जाऊ शकते.
अॅड. वेणुगाेपाल : जुनी बँक खाती लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१८ केली जाऊ शकते. यावर विचार सुरू आहे.
कोर्ट : या प्रकरणी सविस्तर सुनावणीची गरज आहे यात दुमत नाहीच. मात्र, सर्व याचिकाकर्त्यांनी आपली बाजू नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी करणाऱ्या न्यायपीठासमोर मांडावी.उर्वरित. पान १२

आधार प्रकरणामध्‍ये हे आहेत 4 याचिकाकर्ते  
1) कर्नाटक हायकोर्टाचे माजी न्‍यायाधीश के.एस. पुट्टस्‍वामी. 
2) मॅगसेसे पुरस्‍कार विजेते आणि नॅशनल कमिशन फॉर चाइल्‍ड राइट्सचे पहिले चेअरमन शांता सिन्‍हा. 
3) संशोधक आणि कार्यकर्त्‍या कल्‍याणी सेन मेनन 
4) कनार्टकचे मॅथ्‍यू थॉमस.    
बातम्या आणखी आहेत...