आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Activity Of Stopping Asaram Bapu From Leaving India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापूंना देश सोडण्यास बंदी घालण्याबाबत हालचाली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - 16 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू यांना देश सोडण्यास बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी पोलिस लूकआऊट नोटीस जारी करतील. दरम्यान, आसाराम व त्यांच्या सहकार्‍यांना समन्स बजावण्यात आले. त्यांना 30 ऑगस्टपर्यंत जोधपूर पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

अहमदाबादच्या चांदखेडा पोलिसांमार्फत आर्शमाच्या अधिकार्‍यांकडे आसाराम यांचे समन्स सोपवले. तसेच त्यांच्याकडे आसारामांबाबत विचारणा केली. आसाराम यांचे मुख्य सेवेकरी शिवा यांना समन्स पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे छिंदवाडात गेलेल्या जोधपूर पोलिस पथकाने गुरुकुलचे पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली आहे.

समन्समध्ये अत्याचाराचे कलम 376 :
आसाराम व त्यांच्या सहकार्‍यांच्या नावे पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये लावलेली सर्व कलमे आहेत. त्यात अत्याचाराशी संबंधित कलम 376 चाही समावेश आहे. त्याआधी रविवारी काही वृत्तवाहिन्यांतील वृत्तानुसार जोधपूर पोलिसांनी आसाराम यांच्याविरुद्ध बलात्काराशी संबंधित कलम वगळण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी त्याचा इन्कार केला.

आसाराम सैतान निघाले : पीडित मुलीच्या पित्याने छिंदवाडा येथे माध्यमांशी बोलताना आम्ही गेल्या आठ - दहा वर्षांपासून आसाराम यांच्या संपर्कात आहोत. आमची दोन्ही मुले गेल्या पाच वर्षांपासून गुरुकुल आर्शमात राहून शिक्षण घेतात. आम्ही त्यांना देवता समजत होतो, परंतु ते तर सैतान निघाले.

पीडित कुटुंबाच्या घरासमोर पोलिस चौकी : शाहजहांपूर येथील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या घरासमोर तात्पुरती चौकी उभारली आहे. छिंदवाडाच्या गुरुकुलमध्ये शिकणार्‍या पीडिताच्या भावाला मध्यप्रदेश पोलिसांनी बाहेर काढून सुरक्षितरित्या घरी पोहोचवले.


कॉलेज कट्टय़ांवर पार्टीची चर्चा
दरम्यान, या घटनेने शहरातील समाजमन अस्वस्थ झाल्याचे दिसले. नागपुरात सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू होती. पार्टीत सापडलेल्या तरुण-तरुणी अभियांत्रिकी, एमबीए महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या होत्या. दिवसभर कॉलेजकट्टय़ांवर रेव्ह पार्टीची चर्चा रंगलेली होती. पार्टीत सापडलेले ‘ते’ दिवटे कोण, याची विद्यार्थी व महाविद्यालयीन प्राध्यापकांत चर्चा सुरू होती.