आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Aamir Khan Next Brand Ambassador Of Election Commission

आमिर खान होणार निवडणूक आयोगाचा \'ब्रँड अ‍ॅम्बेसिडर\', विना मानधन करणार काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 व्‍या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान निवडणूक प्रक्रिया चालणार आहे. 16 मे रोजी निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना जागृत करण्‍यासाठी हिंदी चित्रपट कलाकार आमिर खानची ''ब्रँड अ‍ॅम्बेसिडर" म्‍हणून निवड करण्‍याचा निर्णय घेतला आहे. लवकरच अमिर खानसोबत निवडणूक आयोग मुद्रीत माध्‍यम आणि ऑडियो- व्‍हीडीओच्‍या माध्‍यमातून कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. निवडणूक आयोगाच्‍या कामासाठी मानधन घेणार नसल्‍याचे आमिर खानने स्‍पष्‍ट केले आहे.
पाचवा ''ब्रँड अ‍ॅम्बेसिडर" होणार आमिर खान
निवडणूक आयोगाचा पाचवा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्‍हणून आमिर खान काम करणार आहे. या आगोदर माजी राष्‍ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि बॉक्‍सर मेरीकोम यांनी निवडणूक आयोगासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्‍हणून काम केले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा आमिर नंतर कोण्‍ा होणार ''ब्रँड अ‍ॅम्बेसिडर"