आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सावधान इंडिया'च्या कलाकाराचे "क्राइम', बनावट पत्रकार बनून मंत्र्यांना धमक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - "सावधान इंडिया', "गुमराह' आणि "क्राइम पेट्रोल'सारख्या मालिकांच्या माध्यमातून समाजाला गुन्हेगारी प्रवृत्तीपासून सावधान करणारा कलाकारच गुन्ह्यांच्या गोरखधंद्यात सापडला आहे. या मालिकांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका करणारा कृष्णकुमार हा अभिनेता मंत्री आणि आमदारांना धमक्या देऊन वसुली केल्याप्रकरणी गजाआड झाला आहे.

स्वत:ला एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी सांगून स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्याने जयपूरमधील आमदार घनश्याम तिवारी यांच्याकडून लाच मागितली होती. दरम्यान, तिवारी यांनी या प्रकरणाची तक्रार केली आणि त्यावरून मंगळवारी कृष्णकुमारला दिल्लीतून अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक जंगा श्रीनिवास राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार श्रीवास्तव ऊर्फ किशन हा दिल्लीच्या उत्तमनगरचा रहिवासी आहे. मुंबईत जिम ट्रेनर म्हणून काम केल्यानंतर त्याने नुकताच प्रदर्शित "शमिताभ' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक भूमिकाही केली आहे. आमदार तिवारी यांना त्याने २९ ऑक्टोबर रोजी धमकीवजा फोन केला होता. दरम्यान, पोलिसांनी आता त्याचे कॉल रेकॉर्ड आणि बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे.

कामधंदा नसल्याने बनावट पत्रकारिता
मागील बऱ्याच दिवसांपासून कृष्णकुमारला कामधंदा मिळत नव्हता. त्यामुळे तो मुंबईतून दिल्लीला परतला होता. दरम्यान, त्याच्या काही पत्रकार मित्रांशी त्याची भेट झाल्यानंतर त्याला स्टिंग ऑपरेशनची कल्पना सुचली. त्यावरून त्याने इंटरनेटच्या माध्यमातून दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या आमदारांचे मोबाइल क्रमांक गोळा केले. नंतर वेगवेगळ्या माध्यम समूहाचा पत्रकार म्हणवत त्यांना धमकी द्यायला सुरुवात केली. दरम्यान, अनेकांकडून पैसेही उकळले.
बातम्या आणखी आहेत...