आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टिर रवी किशनने केला भाजप प्रवेश, म्हणाला- मोदींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक मध्यावर आली असताना भोजपुरी अॅक्टर रवी किशनने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी रवि किशनसोबतचा एक फोटो ट्विट करुन ही माहिती दिली. रवी किशनने पक्षाच्या दिल्ली मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. रवी किशनने 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्याला अपयश आले होते. 
भाजप प्रवेशानंतर रवी किशनसोबत आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली. तो म्हणाला, 'काँग्रेसची कोणतीही विचारधारा नाही. मी मोदींच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.'
- 'मोदीजी देशाला बदलत आहे. मला वाटते की उत्तर प्रदेशही बदलला पाहिजे आणि त्यासाठी ते काम करतील. उत्तर प्रदेशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जातील.'   
2014 मध्ये पराभूत झाला होता रवी किशन 
- रवी किशनने 2014 मध्ये लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे भाजप उमेदवार के.पी.सिंह यांनी त्याचा पराभव केला होता. 
- तेव्हा तो म्हणाला होता, की राजकारणासाठी नाही तर काम करण्याची संधी मिळावी यासाठी निवडणूक लढलो होतो. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...