आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Alia Bhatt And Daisy Shah, Chandigarh News In Marahti

चंदीगडची ही महिला करते आलिया भट्ट-वरूण धवनसारख्या सेलेब्सचा मेकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - आलिया भट्ट, वरूण धवनसारख्‍या अनेक बॉलिवूड कलाकारांचा मेकअप करणारी आंतरराष्‍ट्रीय दर्जाची मेकअप आर्टिस्ट रितू कोलेंटाइन हिचा पहिला हेयर अॅन्‍ड मेकअप शो चंदीगड येथील स्‍टाईल वीकमध्‍ये झाला. यावेळी dainikbhaskar.com सोबत बोलताना रितूने आपले अनुभव शेअर केले.

वीस वर्षांपासून ब्‍यूटी करिअरशी जोडल्या गेलेल्‍या रितू कोलेंटाइनने एवलिन शर्मा, मीरा चोपडा, महक चहल आणि डेजी शाह यांसारख्‍या सेलिब्रिटीजचाही मेकअप केला आहे. रितू ही मुळची चंदीगडचीच असल्‍याने आपल्‍या शहरात तिचा हा पहिला हेअर अँड मेकअप शो होता, त्‍यामध्‍ये लेटेस्‍ट हेअर आणि मेकअप लूकचे सादरीकरण करण्‍यात आले. या शोला मिळालेल्‍या प्रतिसादाने ती भारावून गेली होती.
कार्य लोकांपर्यत पोहोचवायचे - रितू
किंगफिशर स्‍टाईलच्‍या आठवड्यात हा माझा दुसरा सीजन आहे. गेल्‍या वर्षी मेकअप एक्सपर्ट म्‍हणून मी सहभागी झाले होते. मात्र यंदा मला स्‍वतंत्रपणे माझे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. याबाबत आयोजक गौरव शर्मा यांच्‍याशी मी चर्चा केली. त्‍यांनी मला पुन्‍हा मेकअप एक्सपर्ट म्‍हणून सहभागी होण्‍याचे सांगितले, असे रितू कोलेंटाइन या वेळी म्‍हणाली.
16 विविध स्‍टाईल्‍स आणि मेकअपचे सादरीकरण
ड्रीम्स टू फ्लाय थीम किंगफिशर या स्‍टाईल सप्‍ताहात आपण 16 विविध स्‍टाईल्‍स आणि मेकअप रँम्‍पवर सादर करण्यात आले. हे सर्व लूक्‍स प्रत्‍येक वयोगट आणि व्‍यवसायाशी जुडलेल्‍या महिलांसाठी समर्पित होते, असे रितू म्‍हणाली. या क्षेत्राविषयी लहानपणापासून मी खूप स्‍वप्‍न पाहिली आहेत, म्‍हणून या थीमचे नाव 'ड्रीम्‍स टू फ्लाय' असे ठेवले आहे. प्रत्‍येक महिला आपले स्‍वप्‍न सत्‍यात उतरवण्‍यासाठी प्रयत्‍न करत असते तसा माझाही प्रयत्‍न आहे, असे ती म्‍हणाली