आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग्गा जासूसमधील अॅक्ट्रेसचा मृतदेह होता पंख्याला लटकलेला, पतीला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव (हरियाणा) - नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट जग्गा जासूसची अभिनेत्री बिदिशा बेजबरुआने राहात्या घरात आत्महत्या केली आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपात अॅक्ट्रेसचा पती निशित झाला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. 
 
काय आहे प्रकरण..
आसामी फिल्म अॅक्ट्रेस आणि सिंगर बिदिशा बेजबरुआ हिचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला आहे. ती नुकतीच पतीसोबत मुबंईतून गुडगावमध्ये शिफ्ट झाली होती. अॅक्ट्रेसने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र तिच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट सापडलेले नाही. बिदिशा ही प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस होती, अनेक स्टेज शो तिने केले होते. 
 
नुकतीच मुंबईतून गुडगावला केले होते स्थलांतर 
- अभिनेत्री बिदिशा बेजबरुआचा मृतदेह गुडगावमधील सुशांत लोक भागातील तिच्या राहात्या घरी पंख्याला लटकलेल्या आवस्थेत सापडला. हे घर त्यांनी नुकतेच किरायाने घेतले होते. 
- सहायक पोलिस आयुक्त दीपक सहारन यांनी सांगितले की अॅक्ट्रेसच्या वडिलांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. त्यांची मुलगी फोन रिसिव्ह करत नव्हती. 
- पोलिसांनी बिदिशाच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
दरवाजाला लावले होते कुलूप 
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिले की मुख्य गेट आणि दरवाजावर कुलूप लावलेले होते. 
- दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला, तर बिदिशाचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. 
- पोलिस अधिकारी सहारन यांनी बिदिशाच्या पित्याच्या हवाल्याने सांगितले, की अॅक्ट्रेसने लव्ह मॅरेज केले होते. मात्र पती-पत्नीमध्ये नेहमी कुरबूर आणि भांडण होत होते. 
 
मुख्यमंत्री सोनोवाल यांनी केली मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत बातचीत 
- आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत फोनवरुन घटनेची माहिती घेतली. आसामी अभिनेत्रीच्या मृत्यूचा तापस योग्य पद्धतीने करण्याची विनंती त्यांनी खट्टर यांना केली. 
- पोलिस बिदिशाचे फोन, मोबाइल, फेसबुक आणि सोशल साइट्सवरील डिटेल्स तपासत आहे. सोशल नेटवर्किंगवर बिदिशा कोणाच्या संपर्कात होती का त्यांचीही पोलिस चौकशी करत आहे. 
- पोलिसांनी सांगितले की तिच्या पतीचा जबाब नोंदवला जाणार आहे, त्यासाठी त्याला पोलिस स्टेशनला बोलवण्यात येईल.