लखनऊ - \'बाबूमोशाय बंदूकबाज\' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यातील स्टार कास्ट रविवारी लखनऊला पोहोचली होती. या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अॅक्ट्रेस बिदिता बागने divyamarathi.comशी केलेल्या चर्चेमध्ये आपल्या पर्सनल-प्रोफेशनल लाइफ आणि विशेषकरून या चित्रपटाविषयीचे अनुभव शेअर केले.
शूटिंग सुरू असताना पूर्ण टीमला समजले होते नक्षली
- बिदिता म्हणाली, एका बंगाली फिल्म चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गर्दीने आम्हाला आणि आमच्या टीमला नक्षली समजले होते. त्या वेळी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. कसा तरी जीव वाचवून आम्ही तिथून निघालो.
- चित्रपटाबाबत ती म्हणाली, या सिनेमात खूप बोल्ड सीन्स आहेत. आतापर्यंत नवाजुद्दीनला एखाद्या अॅक्ट्रेससोबत इतके स्टिमी, बोल्ड आणि हॉट सीन्स देताना पाहिले नसेल. अनुराग कश्यपने गँग्ज ऑफ वासेपूरमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती, पण मी तेव्हा ती नाकारली होती.
Q- तुझा पहिला हिंदी सिनेमा आहे.... चित्रांगदाने सोडलेला रोल करण्यात काही प्रेशर आले का?
A- प्रेशर घेतले तर काम कसे करता येईल? चित्रांगदाने स्वत:ला सिद्ध केलेले आहे आणि स्टार आहे. मला वाटते, मी त्या रोलमध्ये एकदम फिट झाले. लोकांनी ट्रेलर पाहून पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली. त्यात माझा मेक-अप नव्हता, फक्त काजळ लावलेले होते. उलट सावळी दिसण्यासाठी टॅनिंग केली होती, कारण रोलच तसा होता.
Q- इंटिमेट सीन करताना महिलेला काय समस्या येतात?
A- मला वाटते की, मुलींना मुलांपेक्षा जास्त अडचणी येताता. कारण हीरो तर असे असतात, जे इंटिमेट होत नाहीत, पण मी खूप इझी होते. रिअल लाइफमध्ये जो इंटिमेट सीन होतो, तसेच चित्रपटात दिसायला पाहिजे. आतापर्यंतचे सीन पांघरून टाकून केले जायचे. हॉलीवूडमध्ये किती रिअल वाटते, कारण ते नॅचरल काम करतात. बॉलीवूडमध्ये रेपिस्ट हा मुलीच्या गळ्यावर किस करतो, आणि यालाच रेप म्हटले जाते. मूर्खपणाचे वाटतात हे सीन. आमचे जे सीन झाले ते एकदम रिअल कपलचे सीन आहेत.
Q- नवाझ इझी होता का हे सीन करताना?
A- नाही. आम्ही जेव्हा हे सीन करत होतो, तेव्हा प्रॉब्लेम होत होती. कारण तो खूप सोफिस्टिकेटेड किस होता. जे व्हायला पाहिजे, नेमके तेच होत नव्हते. कारण नवाझसोबत माझा दुसराच दिवस होता. आता ना ते बोलत होते, ना डायरेक्टर. मग मीच म्हणाले की, जर हा सीन जरूरी आहे, तर मीच रि-टेक देते. मग डायरेक्टरने हुश्श केले.
Q- करिअरची सुरुवात कशी झाली?
A- मी माझे करिअर एका मॉडेलच्या रूपात सुरू केले होते. सभ्य साचीशी जोडलेले होते, पण यश मिळत नव्हते. मी बंगाली असूनही बंगाली वाटत नव्हते. येथे मुली हेल्दी असतात, पण मी हडकुळी-उंच होते. म्हणून रिजेक्ट झाले. बंगाली इंडस्ट्रीमध्येही उंच हीरो नसतात. म्हणून कोलकात्यात मला यश मिळाले नाही. मग ग्रॅज्युएशनदरम्यान मुंबईला गेले. आणि एक-एक ऑफर मिळत गेल्या.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, बिदिता दासचे आणखी काही PHOTOS...