आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेस शिवाने सांगितले- \'का करावे लागले B-C ग्रेडचे चित्रपट, आता लाज वाटत नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - &TV वर सुरु होत असलेल्या 'लाइफ का रिचार्ज' मधील लीड अॅक्ट्रेस शिवा उर्फ ज्योती राणाने म्हटले आहे की सिल्व्हर स्क्रिन माझ्यासाठी काही नवे नाही. या क्षेत्रात मी 1998 मध्ये पदार्पण केले होते. शिवा लवकरच पुजा भट्टची फिल्म 'कॅबरे'मध्ये झळकणार आहे. पुजाने ही संधी दिल्याबद्दलन शिवाने तिला धन्यवाद दिले आहेत. मात्र याआधी शिवाने B आणि C ग्रेडच्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याचे कारण आम्ही स्वतः शिवाकडून जाणून घेतले. याच मुलाखतीचा संपादीत भाग खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी.

यासाठी केले B आणि C ग्रेडच्या चित्रपटांमध्ये काम
- शिवाने सांगितले, मी B आणि C ग्रेडचे चित्रपट असे वर्गीकरण करत नाही. माझ्या दृष्टीने याला काहीच अर्थ नाही.
- मी मुंबईत काम करण्यासाठी आले होते, तिथे माझा कोणीही गॉड फादर नव्हता.
- तेव्हा मला जे रोल मिळाले त्यात मी समाधानी होते आणि आनंदाने ते काम करत होते.
- दुसरे असे की माझा सगळा खर्च मलाच भागवायचा होता. माझ्या रोजच्या गरजा, फोन हे मलाच मॅनेज करावे लागत होते.
- मला काम करण्यात कोणतीच लाज वाटत नव्हती.
- आमचे काम म्हणजे 'रोज विहीर खोदायची आणि रोज पाणी काढायाचे.'
काय आहे 'लाइफ का रिचार्ज'
- शिवाने सांगितले, की या शोमध्ये तिचे कॅरेक्टर गंमतीशीर आहे.
- मी एका हायटेक बाईच्या रोलमध्ये आहे. ती सोशल नेटवर्किंग साइट्सने जरा जास्तच प्रभावित असते.
- तिच्यावरील हा प्रभाव तिच्या व्यक्तीमत्वातूनही दिसून येतो. ती टिकली देखील लावते ती वाय-फाय सिग्नल सारखी.
- तिचे मालक जेव्हा तिला विचारतात की उद्या कामावर किती वाजता येणार, तेव्हा ती म्हणते, स्टेट्स अपडेट करेल तो वाचून घ्या.
- सेल्फी तर तिचा जीव की प्राण आहे. ती तिच्या झाडूसोबत एक सेल्फी स्टीकदेखील हातात ठेवते.
- जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ती सेल्फी घेत असते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ज्योती राणाचे आणखी फोटोज्...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...