आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री पूजा भट्टचा चाहता 21 वर्षांपासून अमृतसरच्या तुरुंगात बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - बॉलीवूड अभिनेत्री, निर्माती पूजा भट्टचा एक चाहता अमृतसरच्या मध्यवर्ती तुरुंगात कैद आहे. पूजा भट्टला भेटण्यासाठी परदेशातून आलेला अब्दुल शरीफ हा नागरिक 21 वर्षांपासून भारतीय तुरुंगात कैद आहे.
शरीफ 21 वर्षांचा असताना पूजाला भेटण्याची आस बाळगून तो भारतात बेकायदा घुसला. तेव्हापासून अद्याप तो तुरुंगात आहे.

नव्वदच्या दशकामध्ये पूजाची गणती बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये केली जात होती. 1991 मध्ये अब्दुल शरीफने ‘सडक’ चित्रपट पाहिला आणि तो पूजा भट्टचा चाहता बनला. वेडेपणात त्याने काहीही झाले तरी पूजाला भेटायचेच असे ठरवले होते. पूजाची भेट होऊ शकली नाही, मात्र त्याच वेळी तो स्वत:ची ओळख विसरला. 21 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या अब्दुलची स्मरणशक्ती लोपली आहे. त्याला पूजा भट्टशिवाय कोणतीही गोष्ट आठवत नाही. तो कोणत्या देशातून आला, हे तो सांगू शकत नाही.


प्रेम महागात पडले : 1992 मध्ये वाघा सीमेवरून भारतात घुसखोरी करत असताना शरीफला अटक करण्यात आली. त्याच्याकडे वैध कागदपत्रे नसल्याने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा 1994 मध्ये पूर्ण झाली, मात्र तोपर्यंत तो स्मरणशक्ती गमावून बसला होता. तो कोठून आला हे सांगू शकत नसल्यामुळे त्याला पाठवताही येत नव्हते. तो कधी इराणहून तर कधी पाकिस्तानमधून आलो असल्याचे सांगतो. इंग्रजी वृत्तपत्र ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार अमृतसर तुरुंगाचे अधीक्षक अमरीक सिंह यांनी सांगितले की, आम्ही इराण व पाकिस्तानच्या दूतावासांशी संपर्क साधला, मात्र कोणीही शरीफ आपला नागरिक असल्याचे सांगितले नाही.


दोनच नावे लक्षात : शरीफला केवळ पूजा भट्ट व वडील गुलाम मोहंमद यांचीच नावे लक्षात आहेत. एवढेच नव्हे, तो पूजावरील प्रेमभावना व्यक्त करतो. त्याच्या काही संवादांतून तो पूजावर किती प्रेम करतो याची जाणीव होते. त्याने आपल्या डाव्या दंडावर पूजाच्या नावाचा टॅटू काढला आहे. पूजाला भेटण्याची शरीफची अद्यापही इच्छा आहे. शरीफला तिच्यासोबत एका चित्रपटात काम करावेसे वाटते, असे तुरुंगाचे उपअधीक्षक आर.के. शर्मा यांनी सांगितले.