आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री वेश्या व्यवसायात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - ‘मकडी’चित्रपटासाठी १२ वर्षांपूर्वी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या श्वेता बसू प्रसाद या २३ वर्षीय अभिनेत्रीला वेश्या व्यवसायाच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तिला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.
एका हॉटेलात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांना मिळाली. छापा मारला तेव्हा श्वेतासह दाक्षिणात्य चित्रपटांचे सहायक दिग्दर्शक तेथे होते. दोघांनाही अटक झाली.
श्वेताने ‘इकबाल’,‘वाह लाइफ हो तो ऐसी’, ‘डरना जरूरी है’मध्ये काम केले आहे. ‘कहानी घर घर की’ मालिकेतही ती होती. सध्या ती तेलुगू चित्रपटांत काम करते. दरम्यान, कारकीर्दीत मी अनेक चुकीचे निर्णय घेतले. पैशाची चणचण होती. त्यामुळे मी या दलदलीत फसले,’ असे श्वेताने सांगितल्याचे वृत्त इंग्रजी दैनिकात आहे.