आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछोड प्रकरण: अभिनेत्री श्वेता मेननने आरोप घेतला मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्लम- काँग्रेसचे कोल्लम येथील खासदार एन. पितांबर कुरूप यांनी माफी मागितल्यानंतर अभिनेत्री श्वेता मेनन हिने त्यांच्याविरुद्ध लावलेला छेडछाडीचा आरोप मागे घेतला आहे.

खासदार कुरूप यांनी आपली छेड काढली, असा आरोप श्वेताने केला होता. तिने पोलिसांकडे जबाबही नोंदवला होता. पोलिसांनी कुरूप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण श्वेताने घूमजाव करत आरोप मागे घेत असल्याचा ई-मेल पोलिस ठाण्याला पाठवला.